Source
जलसंवाद, नोव्हेंबर 2017
जलचक्रातील एक प्रमुख स्थान नद्यांचे आहे. नद्यांच्या खोर्यावर मानवी अतिक्रमणामुळे जंगलतोड, खाणकाम ,नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदल आणि नद्यातील गाळ वाढण्याचे प्रमाणे वाढले असून त्यामुळे नैसर्गिक जलचक्रावर विपरीत परिणाम झालेला आहे .
बारमाही वाहणार्या नदया अर्धबारमाही व अर्धबारमाही नदया कोरड्या होत आहेत . याची कारण मीमांसा करून त्या नदया पुनुरुजीवित करणे म्हणजे नदीचे पुनरुज्जीवन करणे होय. नद्यांचे पुनरुत्थानामुळे जलचक्र सुधारण्याची नैसर्गिक प्रक्रिया वाढीस लागणार आहे .जेणेकरून नैसर्गिक झरे, नदीच्या पात्रातील नैसर्गिक प्रवाह ,भूजलाची व पाणलोट क्षेत्रातील भूपृष्ठावरील पाण्याची शाश्वती वाढेल.
अनेक जलसंवर्धन कार्यक्रम सुरु करण्यात आले असले तरी पाणी टंचाईची समस्या गंभीर होत आहे. सरकार आणि अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था या समस्येवर अनेक प्रकारचे उपक्रम जलसंवर्धनासाठी राबवित आहेत .
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सदगुरू श्री श्री रविशंकर द आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक यांनी भारतातील युवापिढीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नद्या पुनरुत्थानाचे प्रकल्प राबविण्याचे आव्हान केले . या श्री श्री गुरुदेवांच्या प्रेरणात्मक आव्हानाला प्रतिसाद देत द आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र ,कर्नाटक , तामिळनाडू , ओडिसा, छत्तीसगड , तेलंगाना या प्रांतांमधील लोकसहभाग नदी पुनरूजीवनाच्या प्रकल्पात अग्रगण्यरित्या सहभागी होत आहेत.
श्री श्री गुरुदेवांच्या दूरदृष्टीने या प्रकल्पाची शाश्वती टिकवण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक अभ्यासाची जोड या प्रकल्पाना देऊन पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण करण्यासाठी या जलसंवर्धन व नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंगने नदी पुनरुज्जीवन विभाग स्थापित केला आहे . ज्यामध्ये भूगर्भशास्त्रातील तज्ज्ञ डॉ . वाय . लिंगराजू . डॉ. एस .के . सुब्रमण्यम. डॉ. अनिल नारायणपेठकर यांच्या भूशास्त्रीय मार्गदर्शनाखाली इतर तज्ज्ञ मंडळी स्वप्नजा दळवी,स्वाती रावत ,अंबिका येमूल ,शगुन पंडित, शांती, भव्यता, श्री शेट्टर, शिवानी कार्यरत आहेत .
हा प्रकल्प राबविण्यासाठी उपग्रह प्रतिमा (satellite imagery) आणि भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेले नकाशे वापरून व भूशास्त्रीय सर्वेक्षण करून भूपृष्टाचा वापर आणि विभागणी , भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा अभ्यास तसेच मातीचे प्रकार , नद्यांचे जाळे , जमिनीचा उतार , भूपृष्ठावरील व भूगर्भातील खडकांची ठेवणं, तसेच भूभौतिक सर्वेक्षण , पर्जन्यमान व इतर वातावरणातील घटक यांचा अभ्यास करून याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजल पातळी व नदी पुनरुज्जीवन करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात येतो .
जलसंवर्धनासाठी जमिनीची धूप मर्यादित ठेवण्यासाठी दगडी बांध, बांध बंदिस्ती व इतर उपाय योजिले जातात . तसेच भूजल पुनर्भरणासाठी शोष विहिरी , इंजेक्शन विहिरी , खोल समपातळी चर व भूपृष्ठावरील जलस्रोत वाढविण्यासाठी नदीपात्रातील , तलावातील तसेच इतर जलस्रोतांमधील गाळाचा उपसा केला जातो .
धूप नियंत्रणावर उपाययोजना :
बोल्डर चेक (BOULDER CHECKS)
दगड बांध ( बोल्डर चेक) यामुळे तीव्र उतारावरील जल प्रवाहाची गती कमी होते व जमिनीची धूप रोखली जाते त्यामुळे मातीची आर्द्रता वाढते आणि नैसर्गिक वनस्पतींना आधार देण्यास मदत होते.
शेततळे (FARM POND) :
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टिने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात .हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते .उद्देश : शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय
गॅबियन बंधारे (GABION BANDHARA) :
नाल्यामध्ये जाळीचे वेष्टनात अनगड दगडाच्या जो बांध घालतात त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात ज्या ठिकाणी नाल्याचा उतार ३ पेक्षा जास्त आहे तसेच पर्जन्यमान जास्त असल्यामुळे लुजबोल्डर स्ट्रक्चर टिकू शकत नाहीत अशा ठिकाणी मृद व जलसंधारणाचे खात्रीचे नियोजनासाठी गॅबियन बंधार्याची उपयुक्तता असते . तसेच पाण्याचा वेग कमी व्हावा आणि पाणी काही काळ तिथे टिकून राहावे आणि या शोष विहिरीमध्ये शोषून घेतले जावे ह्यासाठी याची उपयुक्तता आहे
वृक्षारोपण :
वृक्षारोपण हे जलरेणूच्या संचयनासाठी फार उपयुक्त भूमिका निभावतात पाण्याचा खूप मोठा वाटा भूगर्भात शोषला जातो आणि पाण्याची भूगर्भातील पातळी वाढण्यास मदत होते व पर्जन्यमान वाढण्यास मदत होते . त्यामुळे काही स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणे आवश्यक आहे .
समपातळी चर/ खोल समपातळी चर :
ह्या समपातळी चरामुळे उतारावरून येणारे पाणी अडवले जाऊन वेग कमी होतो आणि त्याचा साठा वाढण्यास मदत होते तसेच जमिनीची धूप रोखली जाते ,आणि त्या चारीच्या बांधावर वृक्ष लागवड केल्यामुळे जमिनीची धूप आणि भूजलपातळी वाढण्यासाठी मदत होते व बाष्पीभवन रोखले जाते आणि हेच पाणी काही कालान्तराने नदी किंवा नाल्यामध्ये वाहत येते आणि नदी पुनरुज्जीवनाची प्रक्रियेस आरंभ होतो.
बांध बंधिस्ती (CAMPARTMENT BUNDING) :
शेताची बांधबंधिस्ती केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर शेतामधींल माती वाहून न जाता तिथेच राहते व पावसाचे पाणी त्याच बांधाच्या आत मध्ये काही काळ राहून भूपृष्टाच्या खाली झिरपते आणि बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते आणि मातीची सुपीकता वाढते .
द आर्ट ऑफ लिविंगचे नदी पुनरुज्जीवनाचे काम २०१२ - २०१३ पासून सुरुवात झाली. या प्रकल्पाअंतर्गत कर्नाटकातील कुमदावती , पालार, वेदावती , तामिळनाडूमधील नागनदी ,पेन्नार खोर्यातील काम चालू आहे . महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यामध्ये वाकी , नरोला, दळती, कासुरा, गोमाई , वेण्णा, पांझण , कल्की , वाघाडी , मुद्गुल, रेना , मांजरा , शिवनदी, माणगंगा , शिवगंगा , बेनीतुरा, घरनी, तेरणा , राजेगावी , बोरी , तावरजा , जाणा या नद्यांच्या खोर्यामध्ये कामे चालू आहे .जळगाव जिल्ह्यातील १६ गावामधील जलसंवर्धनाची कामे झाली व १७ गावाचा कामाचा आरखडा तयार आहे. डॉ. रंजना बोर्से ,श्री देशमुख आणि श्री शामकांत चिंचोळे आणि त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.
जालना जिल्ह्यातील सावरगाव पाणलोट क्षेत्रातील २९ गावाचे काम चालू आहे. व मंथा पाणलोट क्षेत्रातील ४७ गावाचे आणि परतूर पाणलोट क्षेत्रातील ५२ गावाचा कामाचा आरखडा तयार आहे .. गुंगर्डे गावातील गालगटी नदी येथील काम झाले आहेत .डॉ . पुरुषोत्तम वायाळ , परमेश्वर राजभेंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले . तसेच घनसावंगी भैरवी नारोला , विद्रूपा, जटायूशंकर , गोदावरी आणि दुधना या नद्यांच्या खोर्यातील कामे चालू आहेत . यासाठी जयमंगल जाधव आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत सातारा जिल्ह्यातील २४ गावामध्ये काम चालू आहे . पांगरी , गोंदवले, दानावळेवाडी , मोही , मांझावाडी, शिकली, दोरगेवाडी , थांडले , मोरगाले , इंजावावं , पर्यंती, काळचेवाडी , राजवाडा , रनमाला, मार्डी , सोकासन , पिंगळी , कारखेल , काळेवाडी, खुटबाव, जशी या माण नदीच्या खोर्यातील कामे प्रगतीपथावर आहेत . त्यासाठी डॉ . माधव पोळ . अजित पवार , अभय , संजय देशमुख आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत .नागपूर जिल्ह्यातील १७ गावातील ओढ्याचे काम चालू आहे . अगरगाव , वाळणी , उमरी , वद्वनम, वडगाव , गौराला , आमगाव , उखळी , नंदाखूर्द , किन्ही , मन्धावाघोराड , जुनेवानी खुर्द , अंबाझरी मनीष बडवानी त्यांचे सहकारी काम बघत आहेत .नंदुरबार जिल्ह्यातील गोमाई नदी व काळवीट, गोमाई नदी , पुरुषोत्तम नगर तलाव , गावाचे काम चालू आहे . हरीश पाटील त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत . वाशीम जिल्ह्यातील मांगुरपिर तलावाचं काम चालू आहे .
सोलापूर जिल्ह्यात माढा , बार्शी व सांगोला तालुक्यात ७ ओढ्याचे काम चालू आहे . बेलाटी , महूद , वैराग, नराळे, अरण सोलापूर येथील मिरझानपूरच्या विनोद उर्फ देसाई, राजेंद्र वाघमारे , देव गोसकी, रघुराज चव्हाण , श्रीनिवास सादूल, लक्ष्मण भंडारी यांनी परिश्रम घेतले .अमरावती जिह्यांतील खटोड ओढ्याचे काम चालू आहे .औरंगाबाद जिल्ह्यातील वारेगावातील ओढ्याचे काम चालू आहे .
नाशिक जिल्ह्यातील २९ गावात काम चालू आहे , आणि ८ गावाचे आराखडा तयार आहे . डोंगरगाव , चांदवड , ऊसवाद, रायपूर , दुगाव , कोकणखेडे , पिंपळगावी . दाबले . भदाणे, वागदर्डी , धोटने, लखमापूर , परधाडी , जातेगाव , कोंढार, नानाहावे तलाव , कल्की नदी , मंगरूळ , पांझण नदी , अधिखेडे, गंगावे , राजेदरवाडी , पाजारवाडी , टाकली , विंचूर , वाजगाव, खराडे , वागावं , चिराई, पांडारून , नाशिक गंगा घाट , वागडी नदी , गंगापूर डॅम. अशोक गवळी, संजय खैरनार , विजय हाके अनिश मसरानी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा प्रकल्प राबविण्यात मदत केली .अहमदनगर जिल्ह्यातील पाचेगाव , मजलेचिंचोली , कोलार . गावामध्ये ओढा व पाझर तलावाची काम चालू आहे .उस्मानाबाद जिल्ह्यातील काजळा राजेगावी नदीचे तसेच उमरगा येथील नारंगवाडी ,जेवली सांगावी नदी .
आंदूर लोहारे, रुद्रवाडी , मुरूम ताल्मोड, तोरंबा , कामगाव नदी , डॉ जितू कानडे डॉ उदय मोरे ,नितीन भोसले त्यांचे सहकारी परिश्रम घेतले . पुणे जिल्यातील नसरापूर ,राजे , शिवगंगा नदी याचे काम झालीं व रामनदी खोर्यातील भूगाव ,खाणेकर वस्ती ,मानसतलाव , साँग बर्ड या गावाचे आराखडा तयार आहे श्रीमती सांगीता जमदाडे , मनोज तुपे आणि आशिष तिडके यांचे योगदान आहे .लातूर जिल्ह्यातील मांजरा,घरणी, मोडगूळ, तावरजा व रेणा, तेरणा या नद्यांच्या खोर्यामध्ये काम चालू आहे . महादेव गोमारे, विक्रम जाधव , भास्कर विश्वकर्मा यांचे बहुमोल योगदान या कामासाठी मिळाले .
२०१३ मध्ये लातूर जिल्ह्यतील २६८४०० घनमीटर गाळ काढण्याचे काम शिरूर ,अंतपाल , कातपूर, व भालगाव येथील घरणी नदीच्या ओढाचे तसेच २०१४ मध्ये औसा तालुक्यातील नागरगसोगा ,भाड, आलमला , उंबडाग , बुडलोड , भुसणी , रेणापूर , समसपूर , आणि गंगापूर ,शिरूर , पेठ , बाभळगाव तावरजा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून १८१६००० घन मीटर काम झाले .
२०१५ मध्ये रेणापूर , कावा, हिपरसोगा , बामणी , स्कोल , आखारवाई , बाभळगाव , बेनेगाव , बाथनगळी बोरगाव , डपक्याला,दिगोल, देशमुख , इरोंडी, एटी, किनगाव , लिमले , नागपूर , तिवाल्घ्याल, भुईसमुद्रा, तोंडार ओढ्याचे २८५८५५० घन मीटर इतके काम झाले . तसेच भूजल पुनर्भरणासाठी आखारवाई येथे २७ अनगड दगडी बांध आणि २१ शोष विहिरी तयार करण्यात आले आणि १३४१२५० घन मीटर इतका गाळ काढण्यात आला .वरील सर्व उपायांमुळे १२६८७५ इतक्या लोकांना त्याचा लाभ मिळाला . तसेच लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील हलगरा गावाच्या परिसरातील तेरणा खोर्याचे नदी पुनरुज्जीवनाचे काम देखील द आर्ट ऑफ लिव्हिंग व गावकर्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले . यामध्ये १२५००० घन मीटर इतके खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झाले . या कामामुळे १२५०००००० पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तयार झाली आणि भूगर्भातील पुनर्भरणाचा उपायांमुळे १५५०००० इतके लिटर अधिकचे पाणी भूजलात समाविष्ठ झाले .
तसेच रामेगाव येथे सुद्धा जलसंधारणाचे काम शेत बांधबंधिस्ती,ओढ्यातील गाळ काढणे व इतर उपाय योजना करून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच आत्तापर्यन्त झालेल्या उपक्रमामुळे महाराष्ट्रा मध्ये १६५७ कोटी लिटर्स पाण्याची पातळी वाढली आहे. आर्ट ऑफ लिविंग तर्फे ह्या प्रकल्पाचा विकास कामावर काय परिणाम झाला ह्याचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन व युवाचारी नेमून परीक्षण केले जाते.ह्याचा उपयोग पुढील संशोधनासाठी व प्रकल्प राबवण्यासाठी केला जाणार आहे. नागझरी गावात ५००० झाडे लावण्यासाठी ३५ एकर भूखंड वापरले गेले आहे आणि टाकळी गाव येथे १५ एकर जमीन लागवड करण्यात आली आहे आणि झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन विकसित केले आहे.
या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी शासकीय तसेच संयुक्त सेवाभावी संस्था, लोकसहभाग (आर्थिक व श्रमदान ) यांच्या सहकार्यातून तसेच श्री श्री रविशंकर यांच्या कृपा आशीर्वादाने आध्यत्मिक जोडासहित अनेक पाणलोट क्षेत्रात फक्त नद्यांचेच नव्हे तर लोकांच्या मानसिकतेमधील सकारात्मक गोष्टीना वाव मिळाला .
हि फक्त सुरवात आहे ह्याच्यात उत्तरोउत्तर लोकांचा सहभाग वाढत जाऊन लोककल्याणार्थ उन्नती होण्यासाठी पुढील वाटचाल होईल आणि या कार्यासाठी गुरुजींचा आशीर्वाद आहे.
डॉ. अनिल नारायणपेठकर - मो : ९४२३३२५५८७