Source
जल संवाद
मुळात शुध्द पाणी म्हणजे काय ? प्रत्येक नागरिकास मिळणारे पाणी शुध्द की अशुध्द हे कसे ओळखणार आणि त्यांसबधी त्याची जागरुकता किती? ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तिस मधूमेह आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी त्या व्यक्तीच्या रक्ताची चाचणी प्रयोगशाळेत करुन घेणे आवश्यक आहे त्याच धतीर्वर पाण्याची भौतिक रासायनिक जैविक तपासणी करुन घेतल्याशिवाय पाणी शुध्द आहे की अशुध्द हे समजणार नाही.
पाणी हे जीवन आहे असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी पाणी या शब्दाचा अपेक्षित अर्थ 'शुध्द पाणीʆ मानवाची गरज शुध्द पाण्याची आहे. सन 1975 साली जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रकाशीत केला आहे ज्यात असे म्हटले आहे की 1275 द.ल. लोक जगात शुध्द पाण्यापासुन वंचित आहेत. सन 1981 पासूनचे दशक 'आंतरराष्ट्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता' दशक साजरे करण्यात आले आहे. दिवसेदिवस शुध्द पाण्याची समस्या अतिशय गंभिर होत आहे. जे पाणी मानवास तारक आहे तेच पाणी दूषित झाल्यास मारक ठरु शकते. जागतिक स्तरावर दररोज 1400 लोक दुषित पाण्याचे बळी ठरतात दुषित पाण्यामुळे भारतात दरवषीर् 1.5 कोटी लोकांना साथीच्या रोगाची लागण होवून अंदाजे 5.00 लक्ष लोक मृत्यू पावतात 60 टक्के लहान मुलांच्या मूत्यूचे कारणही दुषित पाणीच. सहाव्या पंचवाषिर्क योजनेत शुध्द पाणी मिळण्यासाठी आथिर्क तरतूद केली गेली.संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2010 वषीर् जागतिक जलदिन 22 मार्च रोजी साजरा करताना जे घोषवाक्य जाहिर केले ते असे 'सुदृढ जगासाठी स्चच्छ पाणी '( Clean Water for Health World) जागतिक स्तरावर देखील शुध्द पाणी किती महत्वाचे आहे यासाठी जगात सर्वत्र कार्यक्रम/जन जागरण करुन समाजातील शेवटच्या स्तरातील जनतेस त्याची जाणीव करुन देणे हा उद्देश यावषी जागतिक जलदिन साजरा करण्यामागे असावा.
मुळात शुध्द पाणी म्हणजे काय ? प्रत्येक नागरिकास मिळणारे पाणी शुध्द की अशुध्द हे कसे ओळखणार आणि त्यांसबधी त्याची जागरुकता किती? ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तिस मधूमेह आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी त्या व्यक्तीच्या रक्ताची चाचणी प्रयोगशाळेत करुन घेणे आवश्यक आहे त्याच धतीर्वर पाण्याची भौतिक रासायनिक जैविक तपासणी करुन घेतल्याशिवाय पाणी शुध्द आहे की अशुध्द हे समजणार नाही. प्रत्येक नागरिकास पिण्याचे मानक माहिती असल्याशिवाय त्याचे ज्ञान त्याला होणार नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात असावेत यासाठी जागतिक आरोग्य संघटना भारतीय मानक ब्युरो (I.S.10500-1991) यांनी मानके ठरवुन दिलेले आहेत. सोबत भारतीय मानक ब्युरोचा तक्ता जोडला आहे. सदरच्या तक्त्यात एखादया घटकाचे योग्य प्रमाण व जर पर्यायीस्त्रोत उपलब्ध नसेल तर त्या घटकाची जास्ती जास्त मर्यादा किती हे दर्शविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्यांतर्गत (पूवीर्चे पाटबंधारे खाते) जलविज्ञान प्रकल्प जागतिक बॅकेच्या सहकार्याने सन 1995 पासून सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पात उपलब्ध भुपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील जलसंपदा विषयक, जलगुणवत्ता विषयक, हवामान विषयक आधार सामग्रीचा सर्वागीण उपयोग व्हावा यासाठी हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-2 महाराष्ट्रात 5 ठिकाणी (औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापुर,पुणे) सन 2001 पासुन कार्यान्वित करण्यात आल्या. सदर प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचा मुख्य उदेश प्रमुख नद्यातील मोठया प्रकल्पातील जलगुणवत्ता सिंचनाच्या/पिण्याच्या दृष्टीने कशी आहे हे ठरविणे हा होय.
औरंगाबाद येथील जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-2 ही हेडगेवार रुग्णालयानजिक आहे सदर प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी अनुभवी असून उच्च विद्याविभूूषीत आहेत. या प्रयोगशाळेत जायकवाडी, मांजरा, निम्नतेरणा, येलदरी, विष्णूपूरी, अप्पर पेनगंगा प्रकलप, माजलगांव, लोणार सरोवर या जलाशयातील तसेच गोदावरी मांजरा, तेरणा, पूर्णा, दुधना, खाम, मानार, लंेडी, इ नद्यातील पाणी नमूने संकलित करुन त्याची भोतिक रासानिक व जैविक तपासणी करुन त्यांचे निष्कर्ष विशेष संगणकीय प्रणालीचा वापर करुन जतन करण्यात येतात. सदर केंद्राची जलगुणवत्ता बाबतची आधार सामग्री मागणी केल्यास आधार सामग्री उपभोक्ता गटाचे सदस्य होवुन सशुल्क उपलब्ध होवू शकते. या प्रयोगशाळेत असणारी अत्याधूनिक उपकरणे यांचा वापर पूर्ण व्हावा या उद्देशाने खाजगी व्यक्ती/ संस्था/शेतकरी /कारखाने/हॉटेल्स /दवाखाने /शासकीय सस्था/ कार्यालय इत्यादीनी त्यांच्याकडील पाण्याचे सांडपाण्याचे पाणी नमूने तपासून देण्याचे ठरविण्यात आले व त्यानुसार अनेक संस्था, व्यक्ती यांनी या सुविधेचा वापर करून पाणी नमुने तपासुन घेतले आहेत. यात जानेवारी 2010 अखेर 1000 खाजगी पाणी नमूने असून उर्वरित शासकीय पाणी नमूने आहेत.
सदरील प्रयोगशाळेमाफर्त ग्रामीण स्तरावर जलसाक्षरता दिन दरवषीर् साजरा करण्यात येतो. या प्रयोगशाळेस आतापर्यत विविध मान्यवंरानी भेट देवून येथील कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
प्रयोगशाळेतील गुणवतेत सातत्य राखण्यासाठी प्रयोगशाळेत अॅनालीटीकल क्बालिटी केट्रोल टेस्ट घेण्यात येते. तसेच Intra Lab AQC Exercise मध्येही भाग घेण्यात येतो. केद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी दिल्ली यांनी घेतलेल्या Lab AQC Exercise मध्येही या प्रयोगशाळेने भाग घेवून त्यात यश संपादन केले आहे.
सबब आपणास आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरातील पाण्याचे नमूने या प्रयोगशाळेत पाठवून पाण्याची गुणवत्ता तपासून ध्यावी व निरोगी भारत व्हावा यासाठी प्रयत्न करावेत.
वि.द.नेमाडे, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान प्रकल्प विभाग, औरंगाबाद
वि.पु.कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी, जलविज्ञान प्रक्लप उपविभाग, औरंगाबाद
आशय दि.महाजन, सरकारी परिक्षक, जलगुणवत्ता प्रयोग स्तर-2, औरंगाबाद
पत्ता:
जलगुणवत्ता प्रयोगशाळा स्तर-2, हेडगेवार रुग्णालयाजवळ, औरंगाबाद 432005, फोन 0240-2355410इमेल sdehpsd.aurangabad@mahahp.org