राजस्थानचे रजत जलबिंदू - 12

Submitted by Hindi on Tue, 07/05/2016 - 10:16
Source
जल संवाद

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर


हक से बहसे हाकडो, बंध तुटसे अरोड
सिंघडी सूखो जावसी, निर्धनियो रे धन होवसी।
उजडा खेडा फिर बससी, भागियो रे भूत कमावसी
इक दिन ऐसा आवसी।


हाकडो - त्यानंतर समुद्र, त्यावरून दरियाव, मग त्यावरून वस्, दरिया - नदी बनल्या. हाकडोला, तेव्हा ह्याच भागात कधीतरी लुप्त झालेल्या प्राचीन सरस्वती नदीच्या बरोबर सुध्दा ठेवून बघून झाले आहे. आज ह्या भागात गोड्या पाण्याचा चांगला साठा आहे अस समजवले जातय.... आणि याचा संबंध त्या नद्यांच्या झिरपण्याशी जोडला जातो आहे. सीमेच्या पलीकडे पाकिस्तानच्या सख्खर जिल्ह्यात अरोड नावाच्या ठिकाणी एक बांध आहे... एक दिवस असा येईल, की तो बांध तुटून जाईल. सिंध कोरडा पडले, वसलेली खेडी - गावं उजाड बनतील, उजाड गावं पुन्हा वसतील, श्रीमंत गरीब होईल आणि निर्धन धनिक बनतील - एक दिवस असा येईल.

हाकडो ची प्राथमिक माहिती आणि राजस्थानीमध्ये समुद्राची काही नावे आम्हाला श्री. बद्रीप्रसाद साकरिया आणि श्री. भूपतिराम साकरिया यांनी संपादित केलेल्या 'राजस्थानी - हिंदी शब्दकोष', पंचशील प्रकाशन, जयपूर ह्या पुस्तकातून मिळाली. त्यांना नीट समजून घेता आले ते, श्री. दीनदयाळ ओझा (केला पाडा, जैसलमेर) आणि श्री. जेठसिंह भाटी (सिलाबटा पाडा, जैसलमेर) यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून वर व्यक्त केलेली आशा, 'एक दिवस असा येईल', सुध्दा श्री. जेठूजींकडूनच मिळाली. डिंगल भाषेमध्ये समुद्राची नावे, 'राजस्थानी शोध संस्थान', चौपसनी, जोधपूर, मधून प्रकाशित आणि श्री. नारायण सिंह भाटी द्वारा संपादित 'डिंगल कोष' (1957) मधून प्राप्त झाली आहेत.

राज्याच्या पाऊसमानाचे आकडे 'राजस्थानी ग्रंथागार', जोधपूर हून प्रकाशित श्री. इरफान मेहरच्या 'राजस्थानका भूगोल' ह्या पुस्तकातून घेतलेले आहेत. राजस्थानची जिल्हावार जलकुंडली अशी आहे -

नव्याने बनलेल्या जिल्ह्यांचे आकडे आता उपलब्ध नाही आहे.

 

जिल्हा

सरासरी पाऊस

जैसलमेर

16.40

श्रीगंगानगर

25.37

बीकानेर

26.37

बाडमेर

27.75

जोधपूर

31.87

चुरू

32.55

नागौर

38.86             

जालौर

42.16

झुंझुनू

44.45

सीकर

46.61

पाली

49.04

अजमेर

52.73

जयपूर

54.82

चितौडगढ

58.21

अलवर

61.16

टौंक

61.36

उदयपूर

62.45

सिरोही

63.84

भरतपूर

67.15

धौलपूर

68.00

सवाई माधोपूर

68.92

भीलवाडा

69.90

डुंगरपूर

76.17

बूंदी

76.41

कोटा

88.56

वांसवाडा

92.24

झालावाड

104.47

 

वर्षभरामध्ये केवळ 16.40 सें.मी पाऊस मिळणारे जैसलमेर शेकडो वर्षांपर्यंत इराण - अफगाणिस्तान पासून - रशियापर्यंतच्या कित्येक भागातून होणाऱ्या व्यापाराचे केंद्र बनून राहिलेले आहे. त्या दरम्यान जैसलमेरचे नाव जगाच्या नकाशावर किती चमकत होते त्याची झलक 'जैसलमेर खादी ग्रामोदय परिषदे' च्या गोदामाच्या एका भिंतीवर काढलेल्या नकाशामध्ये आजही पाहायला मिळते. त्यावेळी मुंबईस कलकत्ता, मद्रास शहराचे कुठेच नावही नव्हते.

मरूनायक श्रीकृष्णाची मरूभूयात्रा आणि वरदानाचा प्रसंग आम्हाला सर्वप्रथम श्री. नारायणलाल शर्म्माजींच्या पुस्तकात आढळला.

थर वाळवंटाच्या जुन्या अभिधानांमध्ये मरूमेदनी, मरूधन्व, मरूकांतार, मरूधर, मरूमंडल आणि मारव यासारखी नाव - अमरकोष, महाभारत, प्रबंधचिंतामणी, हितोपदेश, नीतिशकत, वाल्मिकी रामायण इ. संस्कृत ग्रंथांमध्ये सापडतात आणि त्यांचा अर्थ 'वाळवंट' ह्यापेक्षा सुध्दा जास्त करून 'एक निर्मळ प्रदेश' असा आहे.

भूमी, आप आणि ताप यांची तपस्या :


बेडूक आणि ढगांचे नाते सार्वत्रिक आहे... पण इथे डेडरिया म्हणजे बेडूक, ढग पाहून नुसते डराव डरांव करत नाही, तर पालरपाणी भरून घेण्याची तीच इच्छा मनात बाळगतो, जी इच्छा आपल्याला पुऱ्या राजस्थानच्या समाजमनांत आढळते... आणि तो अति सामान्यसा दिसणारा - असणारा बेडूकसुध्दा किती पाणी भरून घेवू इच्छितो ? - इतकं की अर्ध्या रात्रीपर्पंत तलावाचा नेष्टा म्हणजे अपरा चालू राहील आणि तलाव काठोकाठ भरेल.

डेडरिया गाण्याची तिसरी ओळ गातांना मुलं त्या ओळीत असलेल्या तलाई (तळी) ह्या शब्दाच्या जागी आपल्या मोहल्ल्याच्या किंवा गावाच्या तळ्याचे नाव घालून गातात. तर दुसऱ्या ओळीत 'पालरपानी भरांव भरांव' च्या ऐवजी कुठे कुठे मेंढक 'ठाला ठीकर भरूं भरूं' असही म्हणतो.

डेडरिया गाण्याचा हा प्रसंग आम्हाला जैसलमेरच्या श्री. जेठूसिंह भाटींकडे मिळाला आणि त्यातले आणखी काही बारकावे जैसलमेरच्याच श्री. दीनदयाळ ओझा ह्यांनी जोडलेत. ढग जमा झाले की मुलं तर डेडरिया गात निघतात आणि मोठी माणसं मातीच्या मडक्यात घुगऱ्या शिजवतात, मग त्या चारही बाजूंना उडवून हवा - पाणी यांना 'अर्ध्य' अपर्ण करतात, अश्याप्रकारे वर्षा चा अरूठ मिटवून टाकतात - म्हणजे पाऊस काही कारणाने रूसला असेल, तर ह्या भेटीद्वारे त्याचा रूसवा काढून टाकून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. हे अनुष्ठान मोकळ्या डोक्याने म्हणजे पगडी न घालता करायचे असते. अश्या प्रकारे लोक जलदेवतेला हे सांगू इच्छितात, की ते दु:खी आहेत, तप्त आहेत. शोकमग्न झालेल्या आपल्या भक्तांना प्रसन्न करावं, यासाठी मग आपला रूसवा सोडून जलदेवतेला अवर्तीर्ण व्हावं लागतं.

कुठे कुठे 'आखा तीज' म्हणजे अक्षय तृतीयेला, मातीचे चार माठ जमिनीवर मांडले जातात.... हे चाम माठ म्हणजे ज्येष्ठ - आषाढ - श्रावण - भाद्रपद ह्या 4 महिन्यांची प्रतीक मानले जातात, त्यात पाणी भरले जाते आणि मग उत्सुक नजरा बघत राहतात, की कुठला माठ पहिल्यांदा गळतो... ज्येष्ठाचा माठ आधी गळाला, तर पाऊस स्थिर असेल असे मानतात. आषाढाचा माठ गळू लागला, तर पाऊस खंडीत स्वरूपाचा असेल असे मानतात आणि श्रावण - भाद्रपद यापैकी कोणता तरी माठ पहिल्यांदा फुटला तर खूप पाऊस पडणार असे मानले जाते.

हल्लीच्या लोकांना 4 महिन्यांच्या माठांची ही गोष्ट फालतू वाटेल, पण जुने लोकही हवामानखात्याच्या अंदाजांना देखील फालतूपणा पेक्षा काही जास्त मानत नाहीत.

वर्षाकाळातल्या ढगांच्या गरजण्यात आणि विजेच्या चमकण्यात - ध्वनी आणि प्रकाश यांच्या गतीचा ठीक स्वभाव, समाज जाणून घेत आलेला आहे... 'तीस कोस री गाज, सौ कोस री रैन' म्हणजे वीज कडाडल्याचा आवाज 30 कोसपर्यंत जातो. पण तिच्या चमकण्याचा प्रकाश तर 100 कोसपर्यंत पसरतो... ध्वनी आणि प्रकाशातला हा सूक्ष्म फरक आम्हाला श्री. जेठूसिंगजींच्या कडून कळला आहे.

राज्याचा विस्तार क्षेत्रफळ इत्यादी चे आकडे यामध्ये श्री. इरफान मेहेर यांच्या राजस्थानका भूगोल ह्या पुस्तकाची मदत घेतली गेली आहे... आणि मग त्यात नव्याने बनलेले जिल्हे जोडले गेले आहेत.... राजस्थानच्या भूभागाचे आधुनिक वर्गीकरण आणि मान्सूनच्या हवामानाची विस्तृत माहिती सुध्दा ह्याच पुस्तकातून घेतली गेली आहे.

खाऱ्या जमिनीची पहिली ओळख आम्हाला सांभर क्षेत्राच्या प्रवासात झाली. तिथपर्यंत आम्ही, तिलोनिया, अजमेरच्या सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर चे साथी - श्री. लक्ष्मीनारायण, श्री. लक्ष्मणसिंहजी आणि श्रीमती रतनदेवी ह्यांच्या सौजन्याने पोहोचलो होतो. बिकानेरचे 'लूणकरण सर' क्षेत्र तर नावानेच लवणयुक्त आहे. इथली सर्व परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला, तिथे काम करीत असलेल्या 'उरगूल ट्रस्ट' ची मदत मिळाली.

ह्याच अध्यायात तापमानासंबंधीचे अंश, पीथ, जलकुंड, माछलो आणि भडली पुराण यांची प्रारंभीक माहिती श्री. बद्रीप्रसाद साकरिया व श्री. भूपतिराम साकरिया ह्यांच्या राजस्थानी शब्दकोष मध्ये मिळाली आहे. वर्षासूचकांमध्ये चंद्रम्याची उभी किंवा झोपलेली (ऊभो या सूतो) स्थिती आम्हाला श्री. दीनदयाळ ओझा आणि श्री. जेठूसिंहजींना समजावून सांगितली... डंक - भडली पुराणात पावसाशी संबंधित काही अन्य म्हणू अश्या आहेत -

1. मंगसर तणी जे अष्टमी, बादली बीज होय।
सांवण बरसै भडली, साख सवाई जोय।।

- जर मार्गशीर्षातल्या कृष्ण अष्टमीला ढग आणि वीज - दोन्ही असतील, तर श्रावणात पाऊस चागला पडेल आणि पिंक सवाईने येतील.

2. मिंगसर बद वा सुद मंही, आधै पोह उरे।
धंवरा धुंध मचाय दे, (तौ) समियौ होय सिरे।।

- जर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पंधरवाड्यात किंवा मग पौषाच्या पहिल्या पंधरवाड्यात सकाळच्या वेळी धुक चांगलं पडलं, तर जमाना चांगला असेल.

3. पोष अंधारी दसमी चमकै बादल बीज।
तौ भर बरसै भादवौ, सायधण खेसै तीज।।

- जर पौष कृष्म दशमीला ढगात वीज चमकली, तर पूर्ण भाद्रपद महिन्यात पाऊस पडेल आणि महिला तीज चा सण चांगल्या तऱ्हेने साजरा करतील.

4. पोह सबिभल पेखजै, चैत निरमल चंद।
डंक कहै है भडड्, मण हूंता अन चंद।।

- जर पौषांत काळे ढग भरून आलेले दिसले आणि चैत्राच्या शुध्द पक्षात चंद्र स्वच्छ चमकेल - म्हणजे आकाश निरभ्र असेल, तर डंक भडलींना (भद्र - सज्जनांना) सांगतो, की धान्य मणामणांनीही स्वस्त होईल.

5. फागण वदी सु दूज दिन, बादल होए न बीज।
बरसै सांवण भादनौ, साजन खेलौ तीज।।

- जर फाल्गुनांत कृष्ण द्वितीयेच्या दिवशी ढग आणि वीजा नसतील, तर श्रावण आणि भाद्रपदात चांगला पाऊस पडेल.... म्हणून हे पतिदेव, (आपण) तीज चांगल्या तऱ्हेने साजरी करू.

ढग जिथे सर्वात कमी येतात, तिथे ढगांची संबोधनं सर्वात जास्त आहेत. अश्या नावाच्या लांबलचक यादीची, सुमारे 40 नावांची पहिली वर्गवारी आम्ही राजस्थानी - हिंदी शब्दकोषाच्या सहाय्याने करू शकलो. त्या यादीत डिंगल भाषेच्या वेगवेगळ्या शब्दकोषांमधून आणखी अनेक नावे जोडली जावू शकतात. कवी नागराजाचा डिंगल कोष ढगांच्या नावांची अशी गणती करतो -

पावस प्रथवीपाळ बसु हब्र बैकुंठवासी, महीरंजण अंब मेघ इलम गाजिते - आकासी।
नैणे - सघण नभराट ध्रवण पिंगळ धाराधर, जगजीवण जीभूत जलढ जळमंडल जळहर।
जळवहण अभ्र बरसण सुजळ महत कळायण (सुहामणा),
परजन्य मुदिर पाळग भरण (तीस नाम) नीरद (तणा)।।

श्री. हमीरदान रतनु विरचित हमीर नाममाला मध्ये मेघांच्या नामावलीची घटा अशी पसरून राहाते -

पावस मुदर बळाहक पाळग, धाराधर (वळि) जळधरण।
मेघ जळद जळवह जळमंदळ, घण जगजीवन घणाघण।।
तडितवांन तोईद तनयतूं, नीरद वरसण भरण - निवांण।
अभ्र परजन नभराट आकासी, कांमुक जळमुक महत किलांण।।
(कोटि सघण, सोभा तन कांन्हड, स्यांम त्रेभुअण स्याम सरीर।
लोक मांहि जम जोर न लागै, हाथि जोडि हरि समर हमीर)।।


श्री. उदयराम बारहठ विरचित अवधान माला मध्ये उरलीसुरली नावे अश्या प्रकारे एकत्रित केली गेली आहेत -

धाराधर घण जळधरण मेघ जळद जळमंड,
नीरद बरसण भरणद पावस घटा (प्रचंड)।
तडितवान तोयद तरज निरझर भरणनिवांण,
मुदर बळाहक पाळमहि जळद (घणा) घण (जांण)।
जगजीवन अभ्रय रजन (हू) काम कहमत किलांण,
तनयतू नभराट(तब) जळमुक गयणी(जा'ण)।।


डिंगल भाषेतील आणखी एक शब्दसूची, जिच्या कर्त्याचं नाव अज्ञातच आहे, ढगांच्या काही ज्ञात - अज्ञात नावांची आणखी भर घातले -

मेघ जळद नीरदं जळमंडण, घण बरसण नभराट घणाघण।
महत किलांण अकासी जळभुक, मुदर बळाहक पाळग कांमुक।
धारधर पावस अभ्र जळधर, परजन तडितवांन तोयद(पर)।
सघण तनय(तू) स्यामघटा(सजि), गंजणरोर निवांणभर गजि।


काळ्या मेघाप्रमाणे उमडणारी ही सूची, कविराज मुरारिदान द्वारा विरचित डिंगरकोष मधल्या ह्या भागावर थांबवली जावू शकते -

मेघ घनाधन घण मुदिर जीमूत (र) जळवाह,
अभ्र बळाहक जळद (अख) नभधुज धूमज (नाह)।।


डिंगल कोषाचे हे संदर्भ आम्हाला, श्री. नारायणसिंह भाटी द्वारा संपादित - आणि राजस्थानी शोध संस्थान, चौपासनी, जोधपूर द्वारा सन 1957 मध्ये प्रकाशित डिंगलकोष मधून मिळाले आहेत.

ढगांचा स्वभाव, रंग - रूप, त्यांचे ह्या दिशेपासून त्या दिशेपर्यंत धावणे, मध्येच एखाद्या टेकडीवर थोड टेकून विश्राम करणे इत्यादी च्या प्रारंभिक सूचना - माहिती - राजस्थानी हिंदी शब्दकोष मधून घेतली गेली आहे.

ह्या काळात जमानो ह्या शब्दातील खरा भाव - श्री. ओम् थानवी, संपादक, जनसत्ता 186 - बी. इंडस्ट्रिअल अेरिया, चंडीगढ यांच्याकडून आम्ही समजू शकलो. श्री. थानवी यांनी सन 1987 मध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्नमेंट, न्यू दिल्ली कडून मिळालेल्या एका संशोधन वृत्तीवर कदाचित पगिल्यांदाच राजस्थानच्या जलसंग्रहावर एक विस्तृत लेख लिहिला होता... आणि ह्या परंपरेचे भव्य दर्शन घडवणारे देखणे फोटोही काढले होते. मग जमानो वर विस्तृत माहिती आम्हाला श्री. जेठूसिंहजी कडून मिळाली. त्यांनीच ज्येष्ठाचं महत्व ज्येष्ठाची प्रशंसा करणारी गोपालांची गाणी तसेच महिन्याच्या एकमेकांतल्या संभाषणांतली ज्येष्ठाची श्रेष्ठता ह्या संबंधीची माहिती पुरवली.

पाऊस पडण्याच्या तूठणो ह्या क्रियेपासून ते उबरेलो म्हणजे पाऊस कमी होत जाण्याच्या प्रक्रियेला आम्ही राजस्थानी - हिंदी शब्दकोषा च्या आधारेच समजून घेवू शकलो.

राजस्थानचे रूपेरी थेंब :


खरोखरच नेति नेति म्हणावे अश्या कुंईला काही मर्यादेपर्यंतच समजायला सुध्दा आम्हाला 7 - 8 वर्ष लागली, हे कबूल करायला आम्हाला जराही संकोच - कमीपणा वाटत नाही. 1988 सालात, तुरू जिल्ह्यातल्या तारानगर भागात आम्ही पहिल्यांदा कुई पाहिली होती, पण हिचं काम कसे चालते - खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी उभी राहूनही, ही गोड पाणी कसं पुरवत राहते - ह्याविषयी प्राथमिक माहिती, बिकानेर प्रौढ शिक्षण समितीच्या एका संमेलनात भाग घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण प्रतिनिधींबरोबर गप्पा करतांना आम्हाला मिळाली. बाडमेरमध्ये बनणाऱ्या पार चा परिचय तिथल्या नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्री. भुवनेश जैन यांच्याकडून मिळाला.

कधीतरी स्वत:च गजधर असलेल्या श्री. किशन वर्मांनी चेजारो आणि चेलवांजी च्या कामांचे बारकावे आणि अडचणी समजावून दिल्या. कुई खोदतांना खीप च्या दोरीने तिला बांधीत जातानाच आणि आतल्या हवेची कमतरता दूर करण्यासाठी वरून एकेक मूळ वाळू जोरात फेकण्याचा अद्भूत प्राकरही त्यांनी सांगितला. श्री. वर्माजींचा पत्ता - 1, गोल्डन पार्क, रामपुरा, दिल्ली - 35.

कुई आणि रेजाणी पाणी यांचा शाश्वत - निरंतर संबंध, जैसलमेरचे श्री. जेठूसिंह भाटी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून - आणि मग जैसलमेरला त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टींमधून आम्हाला समजला. रेजाणी पाणी चांगल टिकत ते बिट्टू रो बल्लियो ह्याच्यामुळे बिट्टू ही - मुलतानी माती - तसेच छोटे दगड म्हणजे मुरडी सखेऱ्याची मिळून बनलेली पट्टी असते. ह्यामध्ये पाणी मुरून, बराच काळ म्हणजे कुठे कुठे वर्ष 2 वर्षांपर्यंत टिकून राहात. खडीची पट्टी देखील हेच काम करते, पण तिच्यात एवढा काळपर्यंत पाणी टिकून राहात नाही. बिट्टू च्या बरोबर उलट असते ती धीये रो बल्लियो. हिच्यामुळे पाणी थांबत नाही आणि म्हणूनच अश्या ठिकाणांहून रेजाणी पाणी घेतले जावू शकत नाही - आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुई बांधली जावू शकत नाही.

सांपणी आणि लठ्ठो यांच्या सहाय्याने होणाऱ्या पार च्या बांधणीची माहिती सुध्दा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली. जैसलमेर पासून 25 कि.मी दूरखडेरोकी ढाणी गावात पालीवालांच्या छहबीसी (सहाविसा - 120) पारांसंबंधी, आम्ही श्री. जेठूसिंह आणि त्याच गावचे श्री. चैनारामजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात समजून घेवू शकलो. आज ह्यांच्यापैकी बहुतेक पार वाळूखाली दबून गेलेले आहेत. असच आणखी एक गाव छंतारगढ - तिथे पालीवालांच्या वेळच्या 30 0हून अधिक कुंई चे अवशेष मिळतात... काही पारांमध्ये आजही पाणी येते.

खडेरोंकी ढाणी सारख्या कित्येक गावांना आज एका - नव्याने बनवलेल्या - ट्यूबवेल मधून पाणी मिळत आहे. हे पाणी 60 कि.मी लांब अंतरावरून पाईपलाईन च्या माध्यमातून येतं. जिथे ट्यूबवेल खोदली गेलीय, तिथे वीज नाहीये... त्यामुळे ती डिझेलवर चालते. हे डिझेलही आणखी कुठूनतरी लांबून टँकरमधून येत. कधी टँकरचे ड्रायव्हर, तर कधी ट्यूबवेल चालवणारे सुट्टीवर जातात... तर कधी डिझेलच उपलब्ध होत नाही... कधी ते उपलब्ध झालेच, तर त्याची चोरीही होते... कधी पाईपलाईन मध्येच फुटते, अश्या तऱ्हेच्या अनेक कारणांमुळे अश्या गावात पाणी पोहोचतच नाही. नवीन बनलेल्या पाण्याच्या टाक्या रिकाम्याच पडून राहतात आणि मग गाव ह्या पारांमधूनच पाणी घेते.

राजस्थानच्या संस्थांनी आणि वर्तमानपत्रांनी, पाणी देण्याच्या अश्या नवीन सरकारी व्यवस्थेने जोडलेल्या आणि जोडल्या जाणाऱ्या गावांची नियमितपणे माहिती ठेवायला हवी.... नव्या माध्यमातून पाणी येतय, तर ते किती येतय ह्याची बित्तंबातमी असायला हवी... म्हणजे मग लक्षात येईल की, आधुनिक मानल्या गेलेल्या पध्दती मरूभूमीत किती मागासलेल्या ठरत आहेत.

इंदिरा गांधी नहर शी जोडल्या गेलेल्या त्या गावांची अशीच स्थिती होवून राहिली आहे, जिथे पूर्वी कुईंमधून पाणी घेतले जात होते. चुरू जिल्ह्यातल्या बूचावास गावात काही 50 पेक्षा जास्त कुई होत्या. सारा गाव संध्याकाळी एकदमच ह्या कईंवर पाणी घ्यायला जमा होत होता... जणू जत्राच भरायची... आता नवीन पाणी कुठूनतरी लांबून पाईपलाईन मधून सिमेंटच्या एका मोठ्या गोल टाकीत येते... टाकीच्या चारही बाजूंनी नळ लागले आहेत... ह्या नव्या पाणवट्या वर जत्रा नव्हे, तर लोकांची झुंबड उडते... भांडण होतात, घडे फुटतात. टाकीत पाणी काही रोज येत नाही. कधी कधी तर आठवड्या - पंधरवाड्यातून एखाद्या वेळी पाणी येते. म्हणून मग पाणी घेण्यासाठी हिसकाहिसकी - झटापट होते. गावातल्या मास्तरजींचे म्हणणे असे आहे, की जर रोजची सरासरी काढली, तर आम्हाला हे नवीन पाणी तितकेच मिळते, जितके विनाझगड्याने कुंईमधून मिळतं. ह्या दरम्यान उखडलेल्या व उजाड झालेल्या कित्येक कुईं पुन्हा दुरूस्त केल्या जात आहेत. कुंई खरोखरच स्वयंसध्दा आणि समयसिध्दा ठरत आहेत.

निर्मळ ठरलंय पाणी ! वाहत्या पाण्याला थोपवून वर्षभर निर्मळ राखणाऱ्या कुंडी ची पहिली झलक आम्हाला सन 1988 मध्ये, सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्नमेंट चे श्री. अनिल अग्रवाल आणि सुश्री. सुनिता नारायण यांच्यासोबत दिल्लीहून बिकानेरला जातेवेळी दिसली... आणि मग कुंई सारखेच हिलासुध्दा समजून घ्यायला आम्हाला खूप वेळ लागला.

कुंडी शब्दाची कुंड ह्या शब्दापासून आणि कुंड शब्दाची यज्ञकुंडा पासून उत्पत्ती झाली असे मानले जाते. जैसलमेर जिल्ह्यात खूप जुमे बैसाखी कुंड सुध्दा आहे , जिथे आसपासच्या फार मोठ्या भागातून लोक अस्थिविसर्जन करण्यासाठी येतात. असे म्हणतात, की वैशाख पौर्णिमेला ह्या कुंडांत साक्षात गंगानदी अवतरते. अश्या कथा कुंडाच्या पाण्याच्या निर्मळपणा व पावित्र्य यांबद्दल सांगतात.

कुंड बनविण्याची प्रथा किती जुनी आहे याचा नीट व नेमका अंदाज करता येत नाही. बिकानेर - जैसलमेर भागात 200 - 300 वर्षांची जुनी कुंडं आणि टाकीसुध्दा आहेत. नव्या तंत्राच्या हँडपंपांना सुध्दा टिकवणारी कुंड चुरू भागात पुष्कळ आहेत. कुंडांचा समयसिध्द आणि स्वयंसिध्द स्वभाव आम्हाला दिल्ली येथील जनसत्ता चे श्री. सुधीर जैन यांनी समजावून दिला.

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 1

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 2

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 3

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 4

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 5

 

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 6

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 7

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 9

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 10

 

राजस्थानचे रजत जलबिंदू - 11