Source
जलसंवाद, मार्च 2015
जलसाक्षरता
नमस्कार मित्रांनो,
तेव्हा तात्पर्य काय तर इथून पुढे आपण सर्वांनीच पाण्याबद्दल, पाण्याच्या वापराबद्दल अतिशय दक्ष, जागरूक राहिले पाहिजे. आणि म्हणूनच या सर्व जलसाक्षरतेच्या उपक्रमांबरोबरच ‘जल है तो कल है।’ हे ब्रीद आपण लक्षात ठेवूयात व त्याप्रमाणे वागूयात.
पोलिओ निर्मूलनानंतर रोटरीने आता साक्षरता मिशन हाती घेतले आहे. समाजातील लोकांमधील अशिक्षितपणा जावून सर्व थरातील लोकांना साक्षर करणे हे आता रोटरीचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी रोटरी इंटरनॅशनलने विविध Literacy Summit, शैक्षणिक प्रकल्प हाती घेतले आहे. त्यातूनच 'TEACH'’ या Literacy related Drive ची संकल्पना आली. पण असे करत असतांना रोटरीच्या अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जलसाक्षरता. अगदी खरं आहे मित्रांनो, जलसाक्षरता म्हणजेच पाण्याबद्दलची साक्षरता, पाणी वापरबद्दल जागरूकता.साक्षरतेबरोबरच समाजातील सर्व थरांतील लोकांना पाणी वाचवण्याबद्दल साक्षर केलेच पाहिजे. नव्हे जलसाक्षरता ही तर आता काळाची गरज आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाची अनियमितता, हवामानातील बदल, पृथ्वीवरच्या भूगर्भातील घटणारी पाण्याची पातळी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी..... आता गंभीर समस्या झाल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सतत पडणारा पाण्याचा दुष्काळ ! त्यात अजून भर पडते आहे ती म्हणजे मिळालेल्या पाण्याचा लोकांनी केलेला गैरवापर, पाण्यावरचे चुकीचे नियोजन, लोकांमधील पाणी वापराविषयीचे अज्ञान !
खूप पूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतरदादा पाटील यांनी म्हटले होते ‘भावी काळात युध्दे होतील तर ती पाण्यावरतीच’ आणि आता त्यांचे म्हणणे खरे होतांना दिसत आहेत. तेव्हा मित्रांनो आता सज्ज व्हा, आपण सगळ्यांनीच एकत्र येवून रोटरीच्या माध्यमातून जलसाक्षरता केली पाहिजे.
या वर्षीचे (2016 - 17)चे आपले प्रांतपाल रो. प्रशांत देखमुख यांनी डिस्ट्रिक्ट च्या सर्व्हिस कमिटी (वॉटर) वर विशेष भर दिला आहे. त्यासाठी रो. सतीश खाडे यांची डिस्ट्रिक्ट सर्व्हिस डायरेक्टर (वॉटर) म्हणून नियुक्ती केली आहे. डायरेक्टर यांनी पाणी वाचवा, पाणी साक्षरता, पाण्याचे नियोजन कसे करता येईल, कमीत कमी पाण्यात शेती कशी करता येईल, विविध पध्दतीने पाण्याचा कसा साठा करता येईल यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रो. सतीश खाडे व त्यांच्या टीमने रोटरीच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये, कॉलेजेस मध्ये, घराघरातून, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांपर्यंत, सरकारी कार्यालये, वैद्यकीय व तांत्रिक, शेतकी महाविद्यालये आणि थेट औद्योगिक क्षेत्रापर्यंत (इंडस्ट्री) पोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
अशाच अनेक उपक्रमांची मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगते - डिस्ट्रिक्ट सर्व्हिस डायरेक्टर रो. सतीश खाडे व त्यांची वॉटर कमिटी यांनी अनेक क्लब्स्ना एकत्र घेवून त्यांना विविध स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले. अर्थातच या सर्व स्पर्धापरीक्षांचा विषय होता ‘पाणी’, ‘पाणी वाचवा, जीव वाचवा’, ‘प्रदूषण’ इत्यादी इथे मला सांगण्यास आनंद वाटतो की या सर्वच स्पर्धापरीक्षांचा अतिशय उत्तम व सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
1. रोटरी क्लब ऑफ पुणे औंध ने ऑगस्ट 2016 मध्ये एक चित्रकला स्पर्धा 'Water Conservation & Rain Water Harvesting' वर घेतली. ही स्पर्धा सर्व Interactors , Earlyactors साठी, तसेच पुण्यातील इतर म्हणजे रोटरीला Attached नसलेल्या शाळांसाठीही घेतली.
2. रोटरी क्लब ऑफ चिंचवड - मोरया ने स्पटेंबर 2016 मध्ये पिंपरी - चिंचवड भागातील सर्व शाळांतून ‘पाणी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली.
3. रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगर ने डिसेंबर 2016 मध्ये पोस्टर स्पर्धा 'Save Water, Save Earth'’ या विषयावर कॉलेज लेव्हल वर स्पर्धा घेतली.
4. रोटरी क्लब औंध ने खास ग्रामीण भागातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
5. वुमन ईन रोटरी ने देखील ‘पाणी ’ या विषयावर एक चित्रकला स्पर्धा घेवून आमच्या या डिस्ट्रिक्ट ड्राईव्ह ला हातभार लावला.
6. आता नुकतीच म्हणजे फेब्रुवारी - मार्च 2017 ला रोटरी क्लब ऑफ कात्रजने ‘जलवसुंधरा’ ही एक फिल्म स्पर्धा 'Save Water' सर्वांसाठी (Open to all) घेतली.
अशा प्रकारच्या सर्व स्पर्धापरिक्षांचा डिस्ट्रिक्ट सर्व्हिस टीमला खूप छान प्रतिसाद मिळाला.या व्यतिरिक्त डायरेक्टर सतीश खाडे यांनी अजून एका वेगळ्या Water Literacy Drive ची संकल्पना प्रत्यक्षरित्या पूर्ण केली. ते असे की अनेक व्यवसायात पाणी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यांच्यासाठी पाणी समस्या, भविष्य आणि यासाठीचे उपाय असा आशय असलेली चर्चासत्रे भरवली. मला इथे सांगण्यास आनंद होत आहे की या संकल्पनेस सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीने प्रतिसाद दिला. त्यामुळे डिस्ट्रिक्ट वॉटर कमिटी, पर्वती क्लब आणि Wide Angle Forum यांनी एकत्रितपणे पुण्यातील विविध आर्किटेक्ट्सना निमंत्रित करून 'Thirsty City '’ हे एक चर्चासत्र आयोजिक केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन रोटरी डिस्ट्रिक्ट सर्व्हिस कमिटी (वॉटर) चे अध्यक्ष रो. सुजाता कुलकर्णी व Wide Angle Forum चे सदस्य आर्किटेक्ट आशिष भोळे यांनी केले. अर्थातच स्वत: रो. सतीश खाडे व नामवंत आर्किटेक्ट यांनी या चर्चासत्राद्वारे अतिषय महत्वपूर्ण माहिती सर्वांना दिली. रो. सतीशच्या मते खरे तर हे आर्किटेक्टस् गेम चेंजर्स ठरू शकतात. त्यांना जर या पाणी संबंधित पध्दती मनावर बिंबवल्या तर ते नक्कीच खूप प्रभावीपणे पाणी संवर्धनात मुख्य भूमिका बजावू शकतात.
बंगले, फार्महाऊस, टाऊनशिप, मॉल्स, इंडस्ट्रीज, टाऊन प्लॅनिंग, प्रशासकिय इमारती या सर्वच ठिकाणी ते पाणी साठवणे, वाचवणे, पुनर्वापर यावर तुलनेने कमी खर्चात कल्पकतेने उपाययोजना करू शकतात. हे या उपक्रमाद्वारे दाखवून दिले. डायरेक्टर खाडे यांनी जलसाक्षरतेसाठी सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट मधील सर्व प्रेसिडेंट्ससाठी पाण्याच्या कामाचे महत्व, कोणकोणत्या काम करायला हवे, रोटरीची क्षमता, मर्यादांची जाणीव ठेवून रोटरी क्लब्स् कोणकोणते प्रोजेक्टस् करू शकतात यावर चर्चा केली. तसेच डिस्ट्रिक्ट च्या ट्रेनिंग प्रोग्राम मधूनही चर्चा केली. जवळ जवळ 15 ते 16 क्लब्स्मध्ये जावून व्याख्याने घेतली. वरती नमूद केल्याप्रमाणे जवळ जवळ प्रत्येक क्लबने पाण्यावरती काम करण्याचा संक्लप केला व बुहतेकांनी तो पूर्णही केला.
बरेचसे क्लब भविष्यात विविध प्रोजेक्टस् करणार आहे. या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीपर्यंत 10 ते 12 क्लब्स् (डिस्ट्रिक्ट 3131 च्या 120 क्लब पैकी) पाणी या विषयावर प्रकल्प करत होते. ती संख्या यंदा 85 ते 90 क्लबवर गेली आहे. म्हणजेच 75 ते 80 टक्के क्लबच्या समाजपयोगी प्रकल्पात पाणी प्रकल्पांना स्थान मिळाले. अशारीतीने पाण्याविषयीच्या लोकशिक्षणातून लोकांना पाणी समस्यांची जाणीव होत आहे व त्यातून विविध उपक्रमशीलता पुढे येत आहे असे रो. सतीश खाडे म्हणतात. म्हणूनच हे जलसाक्षरतेचे काम सतत करत रहाणे आवश्यक आहे. आता मी आपल्याला रो. सतीश खाड्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्लब्स्नी समाजातील विविध घटकांसाठी जलसाक्षरतेवर व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या हे सांगत आहे.
1. शिक्रापूर क्लबने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने माध्यमिक शिक्षकांसाठी उपक्रम केले.
2. भिगवण क्लबने तीन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या समाज - घटकांसमोर जलसाक्षरता अभियान हाती घेतले. यात एकदा ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी तर एकदा शेतकर्यांसाठी तर एकदा कॉलेज युवकांसाठी व्याख्याने झाली.
3. ईस्ट क्लबने त्यांच्या हैप्पी विलेज साठी निवडलेल्या गावात दोनदा जलसाक्षतेवर कार्यक्रम ठेवले.
4. जुन्नर क्लबने मोठ्या सभागृहात शेतकरी मेळावा घेतला. त्यांच्यासाठी ‘जल आख्यान’ ठेवले.
5. पुणे फारईस्ट क्लबने जुलै महिना असूनही पाण्याचे महत्व गावकर्यांना पटावे व पाऊस पडत असतानाच यावर लोकांनी उपाययोजना करावी म्हणून जुन्नर तालुक्यातील तांबे या गावात हा उपक्रम केला.
6. रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड, गणेशखिंड, औंध क्लब यांनी त्यांच्या रोटरॅक्ट क्लब साठी जलसाक्षरतेवर बोलण्यास डायरेक्टर सतीश खाडे यांना आमंत्रित केले.
रोटरी व्यतिरिक्त आपल्या डायरेक्टर सतीश खाडे यांनी काही इंडस्ट्रिज् ना पण भेट दिली. त्यात प्रामुख्याने कान्हे फाटा जवळील Endurance Company, माणगावची PASKO, महाड इंडस्ट्रीयल एरिया, चाकणचा रियल इस्टेट, Indospace, Syngenta (India) या कंपन्यांची नावे घेता येतील.
रो. सतीश खाडे यांनी भेट दिलेल्या काही रोटरी क्लब्समध्ये खालील क्लब्सचा उल्लेख मला करावासा वाटतो ते म्हणजे - रोटरी क्लब ऑफ रॉयल, महाड, शिक्रापूर, दौंड, माणगाव, एअरपोर्ट, मंचर, भिगवण, पनवेल च्या बर्याच क्लब्सना एकत्र घेवून सोबत मिटिंग केली. रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर, अपटाऊन यांच्या शिक्षकांना जलसाक्षरतेवर Vocational Training दिले. त्याचबरोबर श्री. खाडे यांनी विविध रोटरी क्लब्सच्या शाळांना भेटी दिल्या. यात प्रामुख्याने सिंहगड रोड, दौंड, लक्ष्मीरोड, मिडटाऊन, विझडम, निगडी, पिंपरी, मिडईस्ट, यांचा सहभाग होता.
काही Proposed Water Literacy बद्दल प्रोजेक्टस् -
1. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन पुण्यातील किर्तनकारांच्या मदतीने जलसाक्षरतेसाठी काही उपक्रम करणार आहे.
2. सहवास क्लबने पुणे महानगरपालिका व प्लंबर्स असोसिएशन यांच्या मार्फत जलसाक्षरतेचा उपत्रम करण्याचे कबुल केले आहे.
3. शनिवारवाडा क्लब पुण्यातील अनेक दवाखान्यांतून जलसाक्षरतेसाठी मोहिम राबविणार आहे.
4. सिंहगड रोड क्लब पुण्यातील विविध हॉटेल्स, मंगल कार्यालयांतून जलसाक्षरता करण्याचा प्रयत्न करणार आहे.
अर्थातच या वरील सर्व उपक्रमांना श्री. सतीश खाडे व त्यांची कमिटी पूर्णपणे मदत करणार आहेच. जाता जाता अजून एक महत्वाची व आनंदाची गोष्ट मला अभिमानाने सांगितलीच पाहिजे की, डायरेक्टर खाडे व त्यांच्या वॉटर कमिटीने आपल्या या वर्षीच्या म्हणजे ‘स्वीट 16’ च्या 14 लेडी प्रेसिडेंटना एकत्र घेवून 16 मार्च 2017 ते 23 मार्च 2017 असा ‘जलसप्ताह’ (वॉटर फेस्टिव्हल 2016 - 17 ) आयोजित केला आहे. या उपक्रमात दर दिवशी 2 क्लबच्या लेडी प्रेसिडेंट एकत्र येवून काम करतील. थोडक्यात या कार्यक्रमाची रूपरेखा अशी आहे की प्रथम ‘पाणी’ या विषयांतील नामवंत, सुप्रसिध्द वक्ते बोलतील, मग प्रख्यात तज्ज्ञ काही पाण्याविषयीचे तंत्रज्ञान, पध्दती यांची माहिती जेतील. त्यानंतर काही एन.जी.ओ (पाण्याशी संबंधित) माहिती सांगतील. कार्यक्रमाच्या शेवटी दर दिवशी या Speakers, Techniques, NGO's व District 3131 मधील 3 ते 4 रोटरी क्लबच्या प्रेसिडेंटस् ना (ज्यांनी पूर्वी, आता व भविष्यात पाणी संबंधित काही मोठे प्रोजेक्ट्स केले आहेत) त्यांना ट्रॉफिज्, मानचिन्ह देवून सन्मानित केले जाणार आहे.
अशा या कार्यक्रमाच्या पहिल्या म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी आपले ‘भारताचे जलदूत’ श्री. राजेंद्र सिंहजी येणार आहेत. सगळ्यात आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणजे श्री. राजेंद्र सिंहजी यांना तर डायरेक्टर सतीश खाड्यांनी ही संकल्पना - ‘जलसप्ताह’ म्हणजेच 'Water Festival ' Drive for Water literacy इतका आवडला आहे की अशा पध्दतीचा पाण्यासाठीचा उपक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता, असे सांगून म्हणाले हा उपक्रम आपण स्वत: भारतीय पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रचलित करू असे कबुल केले आहे.
तेव्हा मित्र - मैत्रिणींनो आपण सगळ्यांनीच आपल्या या Dynamic Service Director रो. सतीश खाडे यांचे खूप खूप अभिनंदर करूयात.
या जलसप्ताहमध्ये सतीश खाडे हे रो. दत्ता देशकर यांच्या मदतीने जलसाक्षरतेवर ‘जलसंवाद मासिक’ प्रकाशित करणार आहेत. या मासिकामध्ये अनेक रोटरी क्लब्सचे पाण्यावरती केलेल्या प्रोजेक्ट्स ची माहिती, लेख प्रकाशित होतील.
तेव्हा तात्पर्य काय तर इथून पुढे आपण सर्वांनीच पाण्याबद्दल, पाण्याच्या वापराबद्दल अतिशय दक्ष, जागरूक राहिले पाहिजे. आणि म्हणूनच या सर्व जलसाक्षरतेच्या उपक्रमांबरोबरच ‘जल है तो कल है।’ हे ब्रीद आपण लक्षात ठेवूयात व त्याप्रमाणे वागूयात.
जाता जाता पुन्हा एकदा सर्वांनी आपल्या डिस्ट्रिक्ट 3131 च्या ‘जलसाक्षरता’ अभियानास सकारात्मक साथ द्यावी ही विनंती.
(अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट सर्व्हिस - (वॉटर) कमिटी)