इ. स १९६० मध्ये इंग्लंडमध्ये १ लाख कोंबड्या ३ महिन्याच्या आत कोणतीही रोगाराई, साथ नसताना मृत्यू पावल्या व तेथील कुक्कुट पालन व्यवसायिकांना त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का व आर्थिक फटका बसला.
त्या कोंबड्या कशामुळे मृत्यु पावल्या ह्याचे कारण शोधण्याचे काम पशूवैद्यकीय संस्थांना मग देण्यात आले व त्यावेळी आणखी एक धक्कादायक सत्य समोर आले - सर्व कोंबड्यांना लिव्हरचा कॅन्सर झालेला होता.
त्याकरिता मग पुढे कोंबड्यांना देण्यात येणार्या खाद्यपदार्थ इ. ते सखोल विश्लेषण करण्यात आले. तेथे इंग्लंडमधील पशुखाद्य पदार्थात कोणतेही विषारी पदार्थ आढळात आले नाहीत की ज्याद्वारे त्यांचा मृत्यु लिव्हर कॅन्सरने झाला. अखेर तेथील खाद्यपदार्थ तज्ज्ञांना असे आढळले की आयात केलेल्या भुईमूग शेंगांची पेंड कोंबड्यांना दिली की त्यांना वरील लिव्हर कॅन्सर जडतो. पुढील निरीक्षणात त्यांना आयात केलेल्या पेंडेवर बुरशी आढळली. ही बुरशी कोंबड्यांच्या सेवनात आली तरच कोंबड्यांना लिव्हर कॅन्सर होतो हे त्यांना उमजले. त्यामुळे कुक्कुट पालन व्यवसायात प्रचंड खळबख उडाली. ही बुरशी कुठल्या रासायनिक पदार्थाने निर्माण झाली असेल ह्यावर पुढे ३ वर्षे प्रचंड संशोधन झाले व शास्त्रज्ञांना एका भयानक अफलातून विषाचा शोध लागला. ही बुरशी Aspergillus नावाने माहिती होती पण त्यातून Aflatoxin हा घातक विषारी रासायनिक पदार्थ निर्माण होतो हे शास्त्रज्ञांना कळले. ह्या अफलातून अल्फाटॉक्सीन बी१ ह्या घटकामुळे लिव्हर कॅन्सर कोंबड्यांना झाला हे प्रदीर्घ संशोधनाने सिध्द झाले व आपली जी शेंगादाणे पेंडची निर्यात युरोपिअन देशात कुक्कुटपालन व्यवसायात होत होती, त्याला बंदी लागली जी आजवर उठवण्यात आलेली आढळलेली नाही.
पुढे मग हे संशोधन कोंबड्यांपर्यंत थांबले नाही. मग आढळले की असे शेंगादाणे खाद्यपदार्थ माणसाच्या व दुभत्या जनावरांच्या खाण्यापिण्यात सतत आले तर माणसालासुध्दा लिव्हर कॅन्सर होतोच, पुढे मजा म्हणजे हे अफलातून विष कोंबड्यांच्या अंड्यात, जनावरांच्या दुधात, जनावरांच्या मासात विघटन न होता राहू शकते असेही आढळले. पुढे जनावरे म्हणजे तेथील गाईच्या मासातून, गाईच्या दुधातून, कोंबड्यांच्या अंड्यातून ते विष माणसापर्यंत सहज पोहचते व त्यातून त्याला अशा सतत Aflatoxin विष सेवनाने लिव्हर कॅन्सर होतो हे सप्रमाणात सिध्द झाले.
जगभर मग शेंगदाण्याबरोबरच अनेक पिकावर ह्या अफलातून विषावर संशोधन करण्यात आले आणि तेथे जगाला परत धक्का बसला. Aflatoxin जवळ जवळ सर्व पिकावर आढळते. साधारणत: धान्य पिकण्याच्या वेळी तापमान व आर्द्रता ह्यांच्यामुळे Aflatoxin बुरशीची वाढ होते. पुढे जमिनीतील ओलावा, हवेतील आर्द्रता, धान्यातील ओलावा सभोवतालची उष्णता ह्यामुळे अफलाटॉक्सीन ची वाढ जोमदार होते असेही आढळून आले. ह्याचा अर्थ पावसाची जेथे अनियमिता, जमिनीतील पिकातील ओलावा व उष्णता, असे ज्या ज्या देशातील तापमान व धान्याची अयोग्य साठवण तेथे तेथे हे विष दमदारपणे फोफावणारच. भारतात असे हवामान नेहमीच - त्यामुळे हे अफलातून विष भारतातील जवळ जवळ सर्व पिकावर आढळते.
आता पाहू या ह्या Aflatoxin विषाची वाढ आपल्या आवडत्या शेंगदाणे (भुईमूग) पिकावर कशी होते ती -
१. तापमान - विषवृध्दीसाठी साधारणत: (Aspergillus) अस्परजिल्स् ही बुरशी १०° ते ४०° सें. तापमानात जोमाने वाढू शकते. त्यातल्या त्यात २४° - २७° हे तापमान अस्परजिल्स् वाढीस अत्युत्कृष्ट, भुईमूग सशक्त दाणे ह्या तापमानात ह्या बुरशीला बळी पडू शकतात.
२. आर्द्रता - समजा हवेतील तापमान २०° सें. ग्रे असेल व सापेक्ष आर्द्रता ८० टक्के असेल तर भुईमूग दाण्याची आर्द्रता साधारणत: १५ ते २८ टक्के असते.
३. संशोधनातून असे ढळले आहे की भुईमूग दाण्याची आर्द्रता ८ टक्केवर असेल तर अफलाटॉक्सीन विष वाढीला भुईमूग दाण्यावर चांगलात वाव मिळतो.
४. भुईमूगाचे पिक काढल्यावर जेथे किटकानी टरफलावर छिद्रे पाडली आहेत, कुरतडलेली आहेत, तेथे ५ दिवसात ह्या विषाची निर्मिती हमखास होते आणि अशा वेळी पाऊस झाला तर विषाची वाढ दुप्पट होवू शकते.
अशा दाण्याची परिक्षा म्हणजे दाण्याच्या टोकावर हिरव्या रंगाची वाढ दिसते, अल्ट्राव्हायलेट खाली ही बुरशी चमकते. असे हे दाणे माणसाला, जनावरांना अत्यंत हानीकारक ठरू शकतात.
जगात Aflatoxin ह्या विषाचे परिणाम सर्व खाद्य पदार्थात किती असावे जेणे करून ते मानवाला घातक ठरू नये, ह्यासाठी खालील नियम आहेत.
जनावर खाद्यासाठी :
सर्व जनावरांसाठी ०.०२ ते ०.०५ PPM, दुभत्या गाईसाठी ०.०२ PPM अशी परिमाणे आहेत. सर्व खाद्यपदार्थ त्यादृष्टीने तेथे प्रथम ह्या विषाकरता विक्रीचे आधी प्रयोगशाळेत तपासलीच जातात.
परदेशात आयात भुईमूग खालील प्रकारे तपासला जातो -
१. शेंगादाणा आर्द्रता ७ ते ९ टक्के असली पाहिजे.
२. हवा प्रतिबंधक पॅकिंग / वाहतूक
३. (मान्यवर) प्रयोग शाळेचे Aflatoxin free सर्टीफिकेट प्रत्येक पॅकेजचे.
४. प्रत्येक दाणा Electronic यंत्राद्वारे Aflatoxin करता नंतर तपासणे मगच मानव, पशू ह्यांना देणे.
५. भुईमूग तेल Aflatoxin free प्रक्रियेद्वारे निर्माण केले पाहिजे.
भारतातील वैज्ञानिकांना सध्या हे विष जवळजवळ सर्व पिकावर आढळून आले आहे. उदा. तांदूळ, मका, डाळी, वाळलेले खोबरे, मिरची, साबुदाणा, दूध पदार्थ, द्राक्षे, शेंगादाणा व इतर तेल इ. बरेच पदार्थ, ह्याकरता आपल्या भारत सरकराने या prevention of food adulteration act जो १९५४ पासून आपल्या येथे लागू आहे, त्याद्वारे आपल्या येथे भारतात अफलाटॉक्सीन साठी खास कायदा करून हे अफलातून विष सर्व खाद्य पदार्थात ०.०३ mg/kg म्हणजे ०.०३ PPM वर असता कामा नये हा कायदा भारताने केला आहे.
आजवर तरी अफलाटॉक्सीन हे विष आपला शेतकरी थोपवू शकलेला नाहीय त्याकरता हे बुरशी रोखणारे सशक्त बियाणे करणे त्याला अत्यावश्यक आहे. अशा बियाणे निर्मितीनंतर आपण आपल्या धान्य वाळवणे व साठवणींच्या पध्दतीत शेतकर्यांनी आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. शिवाय शास्त्रीय पध्दतीने अफलाटॉक्सीन नष्ट करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याचेही ज्ञान शेतकर्यांना देणे अत्यावश्यक आहे.
जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय नियमावलीप्रमाणे आपल्याला मिळणार्या दैनंदिन दूध, तांदूळ, मका, ज्वारी, डाळी, चहा, कॉफी, अंडी, भुईमूग व इतर तेले ह्या आपल्या वाट्याला येणार्या गोष्टींवर हे अफलातून विष ०.०३ mg/kg आत आहे असे त्यांच्या वेष्टानावर जाहीर करणे उत्पादकांना आवश्यक वाटत नाही का ? तसे नसेल तर फालतू पर्यावरणवादी चळवळी पेक्षा सामान्य जनतेकरता अशी जनजागृती करणे अत्यावश्यक नाही का? ग्राहकराजाने सुध्दा जागृत होवून तशी मागणी करावयास नको का ?
आपल्या सरकारने सर्व खाद्यपदार्थ, धान्ये, तेले ह्यासाठी नियमावली केली आहेत. त्याकरिती BSI, AG मार्क चिन्ह मिळवण्याचे नियमही आहेत, त्याचा आग्रह आपणच आपल्या प्रकृतीसाठी करावयास नको का ? आता तर त्यात इकोलेबलचीही भर पडली आहे, तेव्हा ग्राहकपंचायतीनी ह्यासाठी चळवळ करा. स्वत:ला वाचवा, सध्यातरी भारतात वैज्ञानिक असणे म्हणजे - सुशिक्षित विज्ञाननिष्ठ असून सगळीकडेच विज्ञानभ्रष्ट जीवन अनुभवणे व पिशवीत पडेल ते पवित्र मानून, भारतात परमेश्वर असल्यास त्याच्या कृपेने मी जगेन असे मानूनजगणे, एवढेच भारतीय वैज्ञानिकांच्या हातात आहे.
Dr Moghe has written in his article about Water hyacinth (ObnUu). These Water hyacinth were first found in South America – Amazon. He has stated the conditions in which these water hyacinth are flourised, the temprature and the climatic conditions.
He also stated that how these Water hyacinth can be demolished with the help of acids, pesticides etc. Dr. Pramod Moghe, Mobile:9325380093, मो : ९३२५३८००९३