सोने, चांदी युक्त भूतलावरील अमृत गोमूत्र

Submitted by Hindi on Sat, 08/12/2017 - 12:35
Source
जलसंवाद, ऑगस्ट 2017

पर्यावरण आणि विज्ञानः


(जुलै २०१७ च्या अंकापासून आपण पर्यावरण आणि विज्ञान या नावाची एक मालिका सुरु केली आहे. पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे हे या मालिकेचे लेखक आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य असलेल्या कित्येक गोष्टी आपण टाकाऊ म्हणून नाक मुरडून बाजूला सारतो. पण त्यांचेमागे असलेले वैज्ञानिक सत्य मात्र आपल्याला माहित नसते. अशा काही पर्यावरण पूरक सत्यांचा आपण या मालिकेत शोध घेणार आहोत. )

अजूनसुध्दा वर्तमानपत्रात जेव्हा जेव्हा आपले वेदिक विज्ञानावर आसूड ओढणारे लेख येतात तेव्हाच आम्हा शास्त्रज्ञांना त्यांच्या अज्ञानाचे हसू तर येतेच पण किवही येते. आपल्या स्वतंत्र झालेल्या भारतात शास्त्रीय वैदिक विज्ञानावर भारतातील किती वैज्ञानिक संस्था कोणत्या विषयावर काम करत आहेत ह्याची काडीमात्र कल्पना नसलेल्या अशा लेखातून काय वाट्टेल ते त्यात दुर्दैवाने अनेक वर्तमान पत्रे आघाडीवर आहेत. शेती, बांधकाम, धातूशास्त्र, रंग, सुगंधी द्रव्ये, आयुर्वेद, जनावरांसाठी आरोग्यशास्त्र, पाणी शुध्दीकरण, फळे, पदार्थ, औषधे टिकवणे, जंतूनाशके इ. सर्व क्षेत्रात आपल्या भारतीय विज्ञान क्षेत्रात जवळ - जवळ ७५ संशोधन संस्थाचे जुने वेदिक विज्ञानआधुनिक विज्ञान कसोटीवर तपासून ते किती पायाभूत होते हे जगासमोर ठेवल्याचे कार्य आमच्या राष्ट्रीय रासायनिक शाळेपासून ते अनेक प्रसिध्द विज्ञान संस्थांनी जगापुढे यशस्वीरित्या मांडले आहे ह्याची कुणालाही माहिती नसावी. ह्यासारखे दुर्दैव ते कोणते ? उदा. अगदी आपले जगप्रसिध्द व राष्ट्रपती कै. अब्दुल कलाम हे यज्ञ संकल्पनेवर काम करत होते. हे किती जणांना माहिती आहे ? असो.

आज ह्या लेखाद्वारे आपल्यापुढे गोमूत्र जे भूलोकावरील अमृत म्हणावयास हरकत नाही. ह्याविषयी आधुनिक संशोधनाविषयी माहिती देणार आहे. (एका वर्तमान पत्रात खेदाने असे म्हणावे लागते की गोमूत्र ला थट्टेचा विषय म्हणून उल्लेखला गेलेला नुकताच माझ्या वाचनात आले. पण मग लक्षात आले की विज्ञानाचा यांच्या आयुष्यात काडीचाही संबंध आला नसला तर तो काय तारे तोडणार ते वाचावेच लागणार ) त्या करता हा लेखन प्रपंच.

आयुर्वेदात गोमूत्र हे अत्यंत पवित्र रसायन मानले गेले आहे. गोमूत्रामुळे हृहयविकार, पोटाचे विकार, बध्दकोष्ठता, श्‍वसनरोग, कातडीचे रोग ह्याचे निवारण करता येते. याचे स्पष्ट उल्लेख आहेत.

आता भारतात जे संशोधन झाले त्यावरून त्यावेळेचे ऋषीमुनींचे वैज्ञानिक ज्ञान किती परिपक्व होते हे पाहून आम्ही सर्व शास्त्रज्ञ त्यापुढे नतमस्तक होतो. आपल्या आधुनिक संशोधनात गोमूत्रात खालील रासायनिक घटक आढळून आले ते असे -

 

घटक

घटकांचे कार्य

युरिया घटक

जंतूनाशक

युरिक ऑसिड

कॅन्सर विरोधक

युरिकेनिज

रक्तातील गुढळ्या कमी करणे, रक्तप्रवाह वाढविणे

इपिथेलियम

पेशी पुर्नजीवन

गोनाडोट्रोपिन

रक्तदाब कमी करणे

Alentight

जखमा भरून येणे कॅन्सर विरोधातले ज्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो अशी द्रव्ये

सोने

 

चांदी

 

क -११

बिटा इंडोल AtheticAcid

डायरेक्टाईन

 

३ - मिथेल ग्लायोक्साल

 

नायट्रोजन

मूत्र वाहिन्या व किडनीसाठी उपयुक्त

सल्फर

रक्तशुध्दी

अमोनिया

पेशीरक्षण

तांबे

मेद कमी करणे

लोह

तांबड्या रक्तपेशी वाढवते

सोडियम

Acidity कमी करणे

मॅगेनिज

जंतू प्रतिबंधक

फिनॉल्स

जंतू प्रतिबंधक

व्हिट्रॅमिन

चैतन्यस्फूर्ती A,B,C,D,E

लॅक्टोज

हृदयपोषक

हिपूरिक Acid

विषरोधक

क्रिएटिन

जंतूविनाशक

बेझांईक Acid

बुरशी विरोधक

बेझामाइड

श्‍वसन संस्थेवर, रक्तदाबावर

झिंक

नळे सौंदर्य

कॅल्शियम

हाडे बळकटी, दान संवर्धन

फॉस्फरस

 

 

गोमूत्रावर खालील संशोधनसंस्थांनी प्रचंड कामे केली आहेत
१. Central Institute of Medicinal & plants bIZm¡ (CSIR)
२. गोमूत्र अर्कावरती ६ अमेरिकन / भारती पेटंटस् NEERI नागपूर (CSIR)
३. अमरावती सायन्स कॉलेज
४. पंतनगर युनिव्हर्सिटी
५. शिवाजी युनिव्हर्सिटी (ग्वाल्हेर)
६. IVRI Institute (ईज्जतनगर)
७. Central Drug Research Institute (लखनौ)
८. Art India Medical Science
९. पंचालयम् कोईमतूर
१०. गोविज्ञान इंदूर / नागपूर
११. पं. दिनदयाळ उपाध्याय संस्थान, मथुरा
१२. जूनागढ अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी - गुजरात
१३. शेवटी, फार महत्वाचे व आपल्या फार भूषणावह असे गोमूत्राचे काम प्रसिध्द उद्योजक श्री. राजेंद्र प्रभुदेसाई व त्यांच्या पितांबरी संशोधन संस्थेचे आहे. म्हणजे गोमूत्राचे वरील सर्व गुणधर्म ठेवून गोमूत्राचे रूपांतर कॅल्पसूलमध्ये करणे होय. हे काम अत्यंत कठीण असते, पण ते यशस्वीपणे पितांबरी ने पेलले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या प्राचीन शास्त्राला ह्याद्वारे आधुनिक विज्ञान शिखरावर नेवून ठेवले आहे.

डॉ. प्रमोद मोघे, पुणे, मो : ९३२५३८००९३