जलव्यवस्थापन : काळाची गरज

Submitted by Hindi on Sat, 06/24/2017 - 15:48
Source
जलसंवाद, जुलाई 2012

नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुध्द करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रात सुरूवात झालीच आहे. तसेच गंगा - कावेरी नद्या जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतसरकारने हाती घेतला आहे. आपण जलउपब्धता पाहिली. त्यांच्या गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठ्यासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन. स्प्रिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्ट्या जी पध्दत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाणही ठरविले जाते. पाणी .... पाणी ..... पाणी .... कुठ गेलं पाणी ? कारण आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे. माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत त्या हवा, अन्न, कपडा, घर व पाणी. त्यापैकी मूलभूत गरज आहे ती पाणी. जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा 71 टक्के भाग जलाचा असून 29 टक्के भाग जमिनीचा आहे. त्यातील 98 टक्के भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित 2 टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे.

पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे. याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय ? आपल्या गावातील, परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का पाणी लागत ? मग आपण जलव्यवस्थापन नको का करायला ? हवे ना !

जलाचे प्रमाण त्याची उपयोगीता व उपभोगीता म्हणजे प्रत्यक्ष वापर. यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय. जलसंरक्षण संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जलव्यवस्थापन होय त्यामध्ये -

1. जलाची उपलब्धता
2. गरजांचा अंदाज
3. जल वाटपाचा प्रकार
4. जल व्यवस्थापनात येणार्‍या अडचणींचा आढावा व त्यावर उपाययोजना या सर्व गोष्टींचा विचार व्हावयास हवा.

जागतिक स्तरावर, देश स्तरावर आणि स्थानिक स्तरावर जल उपलब्धतेचे सर्वेक्षण केले जाते. जे जलस्त्रोत आहेत त्यात वर्षभर असणारे पाणी ऋतुमानानुसार जल प्रमाणात होणारा बदल व पाण्याचा दर्जा याचा विचार केला जातो. एखाद्या नदीत वर्षभर व ऋतूनुसार कोठे व किती पाणी उपलब्ध असते ? त्या नदीला पाणी कोठून येते ? नदीप्रमाणेच नैसर्गिक तळी व तलावांचा विचार होतो. नैसर्गिक तळी क्षारमुक्त असल्याने त्याचा उपयोग होतो. तसेच प्रदूषणामुळे नदी व तळ्यांचा पाण्याचा दर्जा कमी होतो. भरपूर पाण्याची उपलब्धता म्हणून गंगा, सिंधू, कावेरी, ब्रम्हपूत्रा, कृष्णा, गोदावरी, नर्मदा ही खोरी भारतातील खोरी प्रसिध्द आहेत.

आता आपण उपलब्धता बघितल्यावर गरजांचा अंदाज बघावयास हवा. प्राचीन संस्कृती नदीकाठावर विकसित झाल्या. तंत्र प्रगतीने नदी नसलेल्या भागातही मानवी वस्त्या वाढल्या लोकसंख्या वाढल्यामुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिककरणामुळे, पाण्याची गरज वाढली. त्यात स्थलांतरीतांमुळे भर पडते. पाणी पुरवणार्‍या व्यवस्थापनेसमोर प्रश्‍न निर्माण होतो. अडचणी निर्माण होतात. मग संघर्ष सुरू होतो. आपल्याकडील कृष्णा कावेरी पाणी तंटा सुरूच आहे. किंवा इतर स्थानिक स्वरूपातील जलवाटप संघर्ष चालूच असतात.

नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुध्द करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रात सुरूवात झालीच आहे. तसेच गंगा - कावेरी नद्या जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतसरकारने हाती घेतला आहे. आपण जलउपब्धता पाहिली. त्यांच्या गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठ्यासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन. स्प्रिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्ट्या जी पध्दत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाणही ठरविले जाते.

हे सर्व करत असताना आपणाला कोणत्या अडचणी येतील ? त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो ? याचा आपण विचार करायलाच हवा. अडचणी निर्माण करणारा मानवच असतो व त्यावर तोडगा काढणाराही मानवच आहे. सर्व प्राणी-पक्षी-पशू यांना पाण्याची गरज असते. परंतु माणसाच्या गरजा वाढल्या असतात. पूर्वी पाणी असेल तेथेच वस्ती असायची. पण आता वस्ती असते तेथे पाणी पुरवठा करावा लागतो. म्हणून जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते. तसेच पाऊस हा लहरी असतो. त्याचे वाटपही समान नसते. तो कधी खूप पडतो म्हणून महापूर येतो तर कधी अजिबात पडत नाही म्हणून शेतकर्‍याला आकाशाकडे डोळे लावून बघत बसावे लागते. त्यामुळे जलव्यवस्थापनेत अडचण निर्माण होते.

भावी जीवनासाठी विचार करता काही उपाय योजना करता येतील.

1. नव्या जलस्त्रोतांचा शोध घेणे.
2. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती व उद्योगांचे नियोजन करणे.
3. जल वापरात घट करणे.
4. पाणी वाया जावू देवू नये.
5. परिसरात वनीकरण करणे.
6. प्रदूषण रोखणे
7. पावसाचे घरावर व छतावर पडणारे पाणी योग्य त्या रितीने साठवून वापर करणे.
8. जलवाटपासाठी वा संरक्षण नी संवर्धनासाठी योग्य तंत्र व साधने वापरणे.
9. जनजागृती करणे, प्रभात फेर्‍या काढणे, वर्तमानपत्रात लेख प्रसिध्द करणे, चित्र प्रदर्शन भरवणे, घोषवाक्य तयार करणे, पथनाट्य सादर करणे.

या वरील सर्व गोष्टींचा विचार करता निश्‍चितच जलव्यवस्थापन होईल यात मुळीच संदेह नाही.

पाण्याच्या योग्य वापरासाठी जनुकीय गणित


शेतीच्या पाण्यासाठी बांधलेल्या धरणांचा वापर इतर कारणांसाठीही वाढला. धरणे बांधण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी त्यातून पाणी सोडण्याचे योग्य सूत्र मात्र सापडले नव्हते. मूळचे नगरचे असलेले स्थापत्य अभियंता डॉ.अविनाश गारूडकर यांनी जनुकीय गणिताच्या आधारे हे सूत्र आता शोधून काढले आहे. त्यामुळे आवर्तनाच्या वेळी वाया जाणारे पाणी वाचविता येईल. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच संशोधन असल्याचा दावा गारूडकर यांनी केला आहे.

आपले शरीर एका उत्तम यंत्राचा नमुना मानले जाते. गुणसूत्रे आणि जनुकांची (जीन्स) एक खास आज्ञावली शरीरात कार्यरत असते. त्यामुळे शरीराला आवश्यक त्या कृती वेळोवेळी सूत्रबध्दरीत्या केल्या जातात. याच्याच आधारे बहुपीक पध्दती असलेल्या, साखळी पध्दतीच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे सूत्र डॉ.गारूडकर यांनी शोधून काढले आहे. या विषयावर त्यांनी पवईच्या आयआयटीमध्ये सहा वर्षे संशोधन केले. त्याबद्दल त्यांना पीएच.डी ही मिळाली आहे. आता हे सूत्र सरकारी यंत्रणांनी पटवून त्याचा प्रतय्क्ष वापर सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ.गारूडकर त्यांनी शोधलेली ही पध्दत जगात एकमेव असून, इतर देशांतूनही आता त्यावर अभ्यास सुरू झाला आहे. ते म्हणाले - आपल्याकडे विविध पीकपध्दती आहे. त्यामुळे धरणातून एकाच पध्दतीने पाणी सोडून चालत नाही, शिवाय, साखळी पध्दतीची धरणे असतील तर हे काम आणखी अवघड होते. एक तर पिकाचे उत्पादन घटते किंवा पाणी वाया जाते. त्यासाठी विचार सुरू झाला. परदेशात एकाच धरणासाठी जुनकीय गणिताच्या आधारे तयार केलेली पध्दत काही ठिकाणी वापरात होती. ती आपल्याकडे वापरता येईल का, याचा विचार सुरू झाला. त्याआधारे अभ्यास सुरू केला.

आपल्या शरीरातील जनुकांचे (जीन्स) एक विशिष्ट गणित असते. त्यानुसार शरीराला विविध आज्ञा दिल्या जातात. त्याआधारे शरीराच्या विविध गरजा भागविल्या जातात आणि कृती केली जाते. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असली, तरी त्यामागे गणिती सूत्र असल्याचे लक्षात आले. हे सूत्र जर शरीर चालविण्याचे काम करीत असले, तर त्याआधारे धरणातून योग्य पध्दतीने पाणी सोडण्याचे सूत्रही ठरविता येईल, असे ठरवून हा अभ्यास केला. सहा वर्षांच्या परिश्रमानंतर आणि आकडेमोड केल्यानंतर हे सूत्र सापडले. त्याआधारे संगणकीय सॉफ्टवेअर विकसित केले असून, धरण परिसरातील पिके, हवामान, माती, पाण्याची पातळई, तापमान अशी प्रकारची माहिती संकलित करून त्यामध्ये नोंदविली, की धरणातून केव्हा व किती पाणी सोडायचे याचे सूत्र सांगितले जाते.

सौ. मीना भुसे, नाशिक - (दू : 9822872149)