सहभागी सिंचन व्यवस्थापनासंबंधी राष्ट्रीय चर्चासत्र - एक अवलोकन

Submitted by Hindi on Sat, 02/06/2016 - 10:25
Source
जल संवाद

महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प अंतर्गत हे दुसरे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र होते. या चर्चासत्रामध्ये एकूण 86 जण सहभागी झाले होते. या चर्चासत्रामध्ये पाच राज्यातील, म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि ओरिसा या राज्यातील तज्ञ मंडळी उपस्थित होती.

जल व भूमि व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद तर्फे महाराष्ट्र जलसुधार प्रकल्पांतर्गत दोन दिवसांचे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन दिनांक 28 - 29 जानेवारी 2010 दरम्यान करण्यात आले. या चर्चासत्राचा अवलोकनात्मक आढावा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखामध्ये करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जलसुधार प्रकल्प अंतर्गत हे दुसरे राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र होते. या चर्चासत्रामध्ये एकूण 86 जण सहभागी झाले होते. या चर्चासत्रामध्ये पाच राज्यातील, म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि ओरिसा या राज्यातील तज्ञ मंडळी उपस्थित होती.

या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, वाल्मीचे महासंचालक अभि.डी.पी. शिर्के हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या सोपेकॉम या अशासकीय संस्थेचे सल्लागार अभियंता एस.एन.लेले हे होते. तसेच वाल्मीचे श्री. सि.एस.देवकर, अधिक्षक अभियंता व सह संचालक, हे उपस्थित होते. चर्चासत्राची सुरूवात सरस्वतीपुजन, भारतरत्न श्री. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दिपप्रज्वलनाने करण्यात आली. या नंतर डॉ.बी.पी.काळे, प्राध्यापक व प्रमुख सामाजिक शास्त्रे विद्या शाखा, तसेच या चर्चासत्राचे समन्वयक, यांनी चर्चासत्राची रूपरेषा सविस्तरपणे मांडली. आपल्या अध्यक्षीय समारोपात अभि. शिर्के यांनी चर्चासत्राचे महत्त्व विषद करून चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन डॉ.रे.भ. भारस्वाडकर, सहयोगी प्राध्यापक, सामाजिक शास्त्रे विद्या शाखा तसचे या चर्चासत्राचे सह समन्वयक यांनी केले.

या चर्चासत्राचे स्वरूप असे होते की, यामध्ये तीन तांत्रीक सत्रामध्ये विषयतज्ञांचे शोधनिबंध सादर करण्यात आले, व त्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. चौथ्या तांत्रिक सत्रामध्ये, सहभागी सर्व तज्ञांचे दोन गट करण्यात आले, व सध्याच्या महत्त्वपूर्ण विषयाबाबत सहभागी सिंचन व्यवस्थापन अधिक प्रभावी कसे करता येईल यावर सखोल चर्चेअंती शिफारशी सादर करण्यात आल्या.

या चर्चासत्राच्या पहिल्या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ.श.गं.भोगले यांनी तर संकलक म्हणून वाल्मीचे प्राध्यापाक तु.सं.गायके यांनी कार्य केले. या सत्रामध्ये महा तज्ञांनी आपले शोधनिबंध सादर केले ते म्हणजे श्री.डी.एम.खाडे, कार्यकारी अभियंता, आय.आर.डी.औरंगाबाद, सहाय्यक प्राध्यापक वाल्मी, औरंगाबाद श्री. सि. सिथापथी राव, अध्यक्ष इरदास, अशासकीय संस्था, हैद्राबाद, आंध्र प्रदेश श्री. एस. एन. लेले सल्लागार, सोपेकॉम पुणे, श्री. गोवर्धन कुलकर्णी, अध्यक्ष महात्मा फुले पाणी वापर संस्था,मु.पो. ओझर (मीग) ता.निफाड, जिल्हा नाशिक, श्री.गोविंद माळी, उपाध्यक्ष, समाज परिवर्तन केंद्र नाशिक.

दुसऱ्या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षपदी अभियंता श्री.एस.एन.लेले हे होते. प्रा.सौ.विद्या पुरंदरे, सहाय्य प्राध्यापक, वाल्मी यांनी संकलक म्हणून कार्य केले. ह्या तांत्रिक सत्रामध्ये एकूण 9 शोधनिबंध सादर केले गेले. त्यामध्ये श्री. चंडीकेश्वासिंग तिवारी, अध्यक्ष पाणी वापर संस्था, गोविंद राम, जिल्हा रेवा, मध्य प्रदेश, डॉ.पी.पी.भोपळे सहाय्यक प्राध्यापक, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला, श्री. आर.एस.बोंढारे, सचिव, कृष्णा कालवा पाणी वापर सहकारी संस्था (मर्यादित), मु.पो.मालेगाव, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड, अभियंता विश्वजित मोहापात्रा, ओरिसा, वाल्मी, कटक, अभियंता सि.सितापथी राव, इरदास, हैद्राबाद, आंध्र प्रदेशा, डॉ. श. गं. भोगले, निवृत्त प्राध्यापक व प्रमुख, प्रा. प्रदीप भलगे, वाल्मी औरंगाबाद आणि प्रा. वसंत मुसांडे, निवृत्त सहाय्यक प्राध्यापक यांनी आपले शोधनिबंध सादर केले आणि त्यावर उपस्थितांनी चर्चा केली.

यानंतर चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 2010 रोजी सकाळी 9.00 वाजता या चर्चासत्राच्या तिसऱ्या तांत्रिक सत्रास सुरूवात झाली. या तांत्रिक सत्राच्या अध्यक्षपदी अभियंता सि.सिथापथी राव, अध्यक्ष इरदास, अशासकीय संस्था, हैद्राबाद, आंध्र प्रदेश हे होते, तर त्यांना संकलक म्हणून प्रा.प्रदीप भलगे, सहाय्यक प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद यांनी सहाय्य केले. ह्या चर्चासत्रामध्ये एकूण 6 शोधनिबंध सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रा. तु. सं. गायके, सहाय्यक प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद, डॉ. द. ग. देशकर संपादक, जलसंवाद, प्रा. होळसंबरे, प्राध्यापक व प्रमुख अभि.विद्या शाखा, वाल्मी, औरंगाबाद. डॉ. रे. भ. भारस्वाडकर, सहयोगी प्राध्यापक, समाजिक शास्त्रे विद्या शाखा, वाल्मी, औरंगाबाद, प्रा. विद्या पुरंदरे, सहाय्यक प्राध्यापक, सामाजिक शास्त्रे विद्या शाखा, वाल्मी, औरंगाबाद आणि डॉ.बी.पी.काळे प्राध्यापक व प्रमुख, सामाजिक शास्त्रे विद्या शाखा, वाल्मी, औरंगाबाद यांनी आपले शोधनिबंध सादर केले.

दोन गटांमध्ये विभागून या चर्चासत्राचे चौथे तांत्रिक सत्र आयोजित केले होते. पहिल्या गटाचे अध्यक्ष, अभि. एस.एन.लेले व त्यांना संकलक म्हणून प्रा.सौ.विद्या पुरंदरे यांनी कार्य केले. तर दुसऱ्या गटाचे अध्यक्ष म्हणून डॉ. श. गं. भोगले यांनी कार्य केले व त्यांना संकलक म्हणून प्रा. एम. वाय खडतरे सहाय्यक प्राध्यापक अभियांत्रिकी विद्या शाखा, वाल्मी औरंगाबाद यांनी संकलक म्हणून कार्य केले. योवेळी सर्व सहभागींनी आपली मते मांडली.

दुपारच्या वेळी पाचव्या तांत्रिक सत्रांमध्ये या दोन्ही गटांनी केलेल्या शिफारशींचे एकत्रितपणे सादरीकरण करण्यात आले व शिफारशींवर संपूर्ण सभागृहाने चर्चेअंती शिक्कामोर्तब केले.

यानंतर या चर्चासत्राच्या निरोपसमारंभासाठी अध्यक्ष म्हणून अभि. डी. पी. शिर्के, महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद यांनी कार्य केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई येथील अभि. एम. एस. मुंडे, सचिव (लाक्षेवि) हे उपस्थित होते. तसेच अभियंता सि.सितापथी राव, अध्यक्ष, इरदास, अशासकीय संस्था, हैद्राबाद, आंध्र प्रदेश आणि वाल्मीचे अभियंता सि.एस. देवकर, अधीक्षक अभियंता व सह संचालक ह्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या निरोप समारंभात डॉ. बी. पी. काळे, प्राध्यापक व प्रमुख, सामाजिक शास्त्रे विद्या शाखा व चर्चासत्राचे समन्वयक यांनी संक्षिप्त अहवाल सभागृहास सादरे केला. यानंतर निवडक प्रमाणपत्रांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. तसेच गटांच्या शिफारशींचे सादरीकरण करण्यात आले. आपल्या भाषणात अभि. एम. एस. मुंढे यांनी सहयोगी सिंचनाची चळवळ पुढे कशी नेता येईल यासंबंधी अत्यंत उद्बोधक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले व या चर्चासत्रातील शिफारशींची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.या निरोप समारंभाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन डॉ. रे.भ. भारस्वाडकर, वाल्मी औरंगाबाद यांनी केले.

या चर्चासत्रातील काही निवडक महत्त्वपूर्ण शिफारशी खालीलप्रमाणे आहेत.

1. पाणी वापर संस्थांच्या यशोगाथांना विस्तृत प्रमाणावर प्रसिध्दी द्यावी.
2. सहभागी सिंचन व्यवस्थापन चळवळीमध्ये अशासकीय संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
3. करारनाम्याचा मसुदा शासनाने लवकरात लवकर प्रसारित करावा.
4. सिंचनासाठी घनमापन पध्दतीने पाणी पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्याने पाणी वापर संस्थांच्या यशस्वीतेसाठी सर्वच राज्यांनी हा घटक अवलंब करावा.
5. सहभागी सिंचनामध्ये स्थानिक नेतृत्व विकासावर भर देण्यात यावा.
6. पाणी वापर संस्थांना भविष्यात पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत.
7. शेतीसंबंधी व्यवस्थापकीय घटकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात कोणती पीके घ्यावीत यासंबंधी जागृती निर्माण करावी.
8. पाणी वापर संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्यावा.
9. उपसा सिंचन पाणी वापर संस्थेसाठी पाण्याचे मिटर उपलब्ध करून द्यावे.
10. भिजणाऱ्या क्षेत्राचा पडताळा करण्यासाठी भविष्यात सेन्सिंगचा वापर करावा.
11. जमिनधारकाच्या पत्नीस सह-सभासद करून मतदानाचा अधिकार देण्याबाबत शासन स्तरावार कार्यवाही करावी.
12. जलसुधारच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जेथे पाण्याची उपलब्धता असते असे प्रकल्प निवडावेत.
13. कराराची शेती व सहकारी तत्वावरील शेती करण्यासाठी उत्तेजन द्यावे.
14. महाराष्ट्र जलसंपदा नियंत्रण प्राधिकरणावर शासनाने, पाणी वापर संस्थेचा प्रतिनिधी नेमण्याबाबत कार्यवाही करावी.
15. सहभागी सिंचन व्यवस्थापनामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करावेत.सहभागी सिंचन व्यवस्थापन विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या निरोप समारंभ प्रसंगी व्यासपीठावर (डाविकडून) श्री. सितापतीराव (हैद्राबाद), श्री.सी.एस.देवकर, सहसंचालक, वाल्मी, श्री. एम.एस.मुंढे, सचिव (लाक्षेवि), श्री.डी.पी.शिर्के, महासंचालक, वाल्मी, डॉ.बी.पी.काळे, प्रा, व प्रमुख, वाल्मी आणि आभार प्रदर्शन करताना डॉ. रे.भ.भारस्वाडकर, सहयोगी प्राध्यापक, वाल्मी, औरंगाबाद

डॉ. रे. भ. भारस्वाडकर, औरंगाबाद