Source
जलसंवाद, मार्च 2017
सदर विहीर तयार होण्याचे आधी पाणी मर्यादित प्रमाणात शिल्लक होते. त्या शेतावर एक बोअर वेल होती व तिला फारच मर्यादित पाणी पुरवठा होता. ठिबक सिंचनाचा लाभ दाखविण्यासाठी कमीतकमी पाण्यात एक एकरवर आंब्याची लागवड करुन ती यशस्वी करुन दाखविली.
रोटरी क्लब, पुणे सह्याद्रीने ने एरफलेवाडी (तालुका रोहा, जिल्हा रायगड) इथे रोटरी कम्युनिटी कोअर 2014 -15 साली सुरु केले. ग्रामीण समाजासमोर असलेले प्रश्ऩ धसाला लावण्यासाठी कोअरचे समन्वयक श्री. रामदास सरफले आणि त्यांची टीम रोटरी क्लबच्या सहाय्याने सतत प्रयत्वशील असतात. अर्थात पाणी समस्या हीही त्यातील महत्वाची बाब आहे. या संबंधातील घेण्यात आलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत :1) पाणी अडवा-पाणी जिरवा :
कोकण विभागात पावसाचे प्रमाण चांगले आहे व त्यामुळे वर्षातून एक पिक समाधानकारकपणे निघते. पण त्या नंतर मात्र पाण्याअभावी कोणतीही हालचाल करता येत नाही. पाणी संकलन होत नसल्यामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस खाली जात आहे म्हणूनच पाणी अडवा-पाणी जिरवा ही चळवळ काळाची गरज होवून बसली आहे. रोटेरियन श्री. दिलिप देशपांडे या संदर्भात कुडली गावात पाणी अडवा-पाणी जिरवाचे प्रयोग करीत असतात. त्यांनी 6 एकर जागेत प्रयोग करुन वाहत्या पाण्याला अवरोध निर्माण केला आहे. शेतात एका विशिष्ट जागी त्यांनी मोठा खड्डा केला आणि पावसाचे पाणी जमा करुन ते जमिनीत मुरवले.त्या खड्ड्याचा आकार 50 फूट बाय 40 फूट बाय 15 फूट एवढा मोठा आहे. यामुळे या शेतावर पडलेला पाऊस संकलित होवून तो जमिनीत मुरतो. 2016 च्या उन्हाळ्यात खड्ड्याच्या जवळ एक 30 फूट खोल विहीर खणण्यात आली. त्या विहीरीत आज 15 फूटांंवर शेतीसाठी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. ते पाणी 10 एकर शेतीला पुरते आहे.
2) ठिबक सिंचन :
सदर विहीर तयार होण्याचे आधी पाणी मर्यादित प्रमाणात शिल्लक होते. त्या शेतावर एक बोअर वेल होती व तिला फारच मर्यादित पाणी पुरवठा होता. ठिबक सिंचनाचा लाभ दाखविण्यासाठी कमीतकमी पाण्यात एक एकरवर आंब्याची लागवड करुन ती यशस्वी करुन दाखविली.
आजूबाजूच्या परिसरातील लोक हा प्रयोग पाहायला येतात, त्यात सहभागी होतात व कमीतकमी पाण्यात शेती कशी करायची हे शिकून जातात. अशा प्रकारे रोटरी क्लब, सह्याद्रीने जलस्वयंपूर्णता कशी मिळवायचे याचा येथे धडा घालून दाखवला आहे.