जलदिंडी अभियान - इंदापूर तालुका - प्रवास

Submitted by Hindi on Sun, 12/06/2015 - 09:56
Source
जल संवाद

आळंदी ते पंढरपूर जलदिंडी प्रवासाला 1 तप झाले. पर्यावरण, स्वास्थ्य व अध्यात्म या तत्वांच्या पायावर आधारित डॉ.विश्वास येवले यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना उभारीस आली. त्याचा प्रसार, प्रचार व प्रवास बऱ्याच गोष्टी जनमानसांत दिसून आल्या.

विज्ञाननिष्ठ मंडळींनी जलप्रवास कुतूहलापलीकडे नेवून पारंपारिक अध्यात्माची युगायुगांची रूळलेल्या वाटेने सकारात्मक स्वास्थ्य व पर्यावरणाची बांधीलकी जनजागृती केली.

पहिली काही वर्षे नदीकाठचे लोक कुतूहलापोटी जवळ आले. जलदिंडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्नेही बनले, हितगूज साधले, व्यथा ऐकल्या, अंधश्रध्दाही जवळून पाहिल्या. मग सर्वांनी डॉ. विश्वास येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला सकारात्मक कार्यक्रम.

आरोग्याच्या बाबतीत गावाकडील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, बालवाड्या, हायस्कूल इत्यादी ठिकाणी - व्याख्याने, खेळ, स्पर्धा भरवून प्रथम विद्यार्थ्यांना व नंतर शिक्षक, युवक, ग्रामस्थ यांना हळूहळू आरोग्याबद्दल जनजागरण चालू केले.

गैरसमजूतीमुळे बरी आर्थिक परिस्थिती असून सुध्दा कमालीचे कुपोषण, मुलांमुलींचे स्त्रियांचे पाहून मन अस्वस्थ झाले. परंतु केवळ अंधश्रध्दा निवारण योग्य आहार पोषणाचे ज्ञान समजावून सांगितले. सुदृढ मातांच्या पोटी सुदृढ बालके निपजली तरच पुढे शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक व सामाजिक आरोग्य नीट होणार.

उवाच व नावाडी पुस्तकांनी तर यात कायमस्वरूपी हृदयात राहणारा विचार ठेवला आहे व आता संगीतबध्द करून खरा जलवारकरी सांस्कृतीक ठेवा अखंड चालू ठेवीत आहे.

आव्हाने भरपूर आहेतच पण नाउमेद न होता मार्ग शोधत डॉ.विश्वास येवले सर्वांना बरोबर घेवून घेतलेला वसा युवक कार्यकर्त्यांशी देत आहे.

खरी गोष्ट मला भावली ती म्हणजे फक्त वृध्द म्हणजे अध्यात्म या पेक्षा युवाशक्तीला भावलेली जलदिंडी फारच प्रभआवी आशा आहे.

अडचणी, समाजातील दोष, आव्हाने, कलियुगातल्या असमतोल झालेल्या गोष्टी यावर उपाय आपणच काढणार आहोत. तो मार्ग जलदिंडी देत आली आहे.

धाडस, शारिरीक शक्ती, अध्यात्मिक मनोबल या आहे. जलवारकऱ्यांचे पैलू व मार्ग आहे वैज्ञानिक विचार व पर्यावरणाचा समतोल साधण्याची प्रत्येकाची जबाबदारी.

जलदिंडी प्रत्येक व्यक्तीला सामावून घेत, प्रोत्साहन देत अव्याहत चालूच आहे. नवे पैलू, नवे यात्री, नव्या दिशा, नव्या आशा व पैलतीरी मानवास घेवून जात आहे. सृष्टीला तारण्यास व संभाळण्यास. काम म्हणून नाही कर्तव्य व जबाबदारी म्हणून.

भिमाईचे पावित्र्य, जीवनदायीत्व प्रदूषण मुक्तता जलाची, मनाची व कर्माचीही.

जलदिंडी तपाचा, प्रवास रोमांचीत, उत्साहवर्धक, प्रेरणादायी, जनकल्याणार्थ, अखंड चालावी हिच सर्व जलवारकऱ्यांना विनम्र प्रार्थना.

डॉ. एस.टी.कदम, बालरोग तज्ज्ञ, इंदापूर