पाणी वापर संस्थांची व्याप्ती व कार्ये

Submitted by Hindi on Fri, 04/14/2017 - 13:40
Source
जलसंवाद, फरवरी 2017

पाणी वापर संस्था म्हणजे काय ?


- पाणी वापर संस्था या पाण्याचा वापर करणा-यांचे एक सहकारी संघटन आहे. पाण्याशी संबंधित हालचाली सर्वांच्या लाभासाठी हाती घेणे हे या संघटनांचे उद्दिष्ट होय.

- अशा संस्थांनी हाती घेतलेल्या सेवा सर्व संस्थात एकाच प्रकारच्या असतील असे नाही. प्रत्येक संस्थांतील सभासदांच्या आशा व आकांक्षा भिन्न असल्यामुळे प्रत्येक संस्थेच्या कार्यक्रमात भि़न्नता असणे स्वाभाविक राहील.

पाणी वापर संस्थांच्या कार्याची व्याप्ती :


- कृषी उत्पादन महत्तम करण्याच्या दृष्टीने पाण्याच्या वितरणाची कार्यक्षम व समन्यायी यंत्रणा उभारणे
- सिंचन संरचनांची शास्त्रीय व सुयोग्य पद्धतीने देखभाल करणे
- सिंचन संरचनेची परिणामकारक व विश्वसनीय व्यवस्थाकीय व देखभाल यंत्रणा उभारणे
- लाभार्थी शेतकऱ्यांकडून सिंचन दरांची व शुल्कांची वसूली करणे
- पर्यावरण व पारिस्थितीकीचे जतन करणे

पाणी वापर संस्थांची प्राथमिक कार्ये :


- शेतकरी व मुख्य सिंचन व्यवस्थापन पद्धती यांच्या मधे दुवा म्हणून काम करणे
- पाण्याचे वितरण करणे
- सिंचन व निचरा पद्धतींची देखभाल व संचालन करणे
- पाण्याचे शुल्क, इतर शुल्क किंवा इतर काही विशेष शुल्क यांची वसूली करणे
- सभासदांमधील वाद सोडविणे
- सभासद आणि बिगर सभासद यांचेमधील वाद मिटविणे
- निचरा व्यवस्थेचे संचालन करणे
- कालव्यांमधून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन देणे
- कालवे आणि इतर रचना यांची दुरुस्ती, देखभाल करणे आणि नवीन डिझाइन्स व संरचना यांचा विकास करणे
- व्यापारी, आर्थिक व पण्याचे हिशोब संभाळणे
- मोठ्या कालवा सबसिस्टिमचे फेडरेशन घडविण्यासाठी इतर पाणी वापर संस्थांशी सहकार्य करणे

पाणी वापर संस्थांची आनुशंगिक कार्ये :


- सभासदांना पीक पद्धती व कृषी पद्धतींबद्दल माहिती पुरविणे व त्यात अनुकूल असे बदल घडवून आणणे
- सिंचित शेतीला लागणाऱ्या विविध निविष्ठा सभासदांना उपलब्ध करुन देणे
- पाण्याचा अधिक चांगला वापर होण्याच्या दृष्टीने सिंचन विस्तार व वृद्धी यांचा अवलंब करणे
- कृषी विस्तार व शेतकऱ्यांचे प्रशिक्षण यांचे आयोजन करणे
- परिसरात अस्तित्वात असलेल्या लिफ्ट इरिगेशन सह पाण्याचा एकत्रित वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे
- शेतमालाचे वर्गीकरण, वेष्टन, साठवणूक व विपणन करण्यासाठी सभासदांना मदत करणे
- सर्व सभासदांनी ठरविल्यास इतर कोणतेही आनुषंगिक कार्य हाती घेणे.

डॉ. दत्ता देशकर, पुणे, मो : 9325203109