माझ्या बायकोचे मामा श्री. आनंद देवधर जे मुंबई येथून क्तक म्हणून निवृत्त झालेले आहेत. क्तक म्हणजे काय? हे माहित नसेल व तसे माहित नसण्याची शक्यता खूप आहे. तर क्तक म्हणजे हैड्रॉलिक इंजिनिअर - ज्याची बिनपाण्याची धुलाई होऊ शकते. जर मुंबईला एक दिवस पाणी पुरवठा झाला नाही तर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या खात्याच्या मुख्य व्यक्तीला क्तक का म्हणावं आणि च्क्तक का म्हणू नये, हे मला कृपया विचारू नका . अरे यार, हैड्रॉलिक इंजिनिअरचा शॉर्ट फॉर्म क्तक होता है, तो उसमे मेरी क्या गलती है? असो. मामा मला खूप वर्षांपासून सांगत आहेत - प्रशांत मुंबईत एक वर्ष जरी व्यवस्थित पाऊस पडला नाही किंवा मुंबईत बाहेरून येणाऱ्या माणसांच्या झुंडी येणे असेच चालू राहिले आणि असे सर्वजण पाणी वापरत राहिले, तर एके दिवशी आपल्याला अर्धी मुंबई रिकामी करावी लागेल. थँक गॉड! मामांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईचा कल्पान्त, अजून तरी सत्यात उतरलेला नाही पण तो दिवस लवकरच उगवू शकेल की !
किये कराये पे पानी याला इंग्लीशमध्ये एक शब्द कोणता ? माहित आहे? फ्लश.थ्री इडिएटस् मधील चतुर महालिंगमच्या भाषेत सांगायचे तर मी म्हणेन ये फ्लश सबकी घरमे होती । हम दिनमे बहूत बार मूत्रविसर्जन करती। और इसके बाद फ्लश करती। पर तुमको मालूम इसका कपॅसिटी कितना होती?
आणि या अशा कपॅसिटीचा (फ्लशच्या) शोध, अंदाजे 6 महिन्यांपूर्वी मला लागला.
झालं अस. मी पुण्याला राहतो. पुण्यातल्या ऐन मे महिन्यातील उन्हाळा. एके दिवशी, एका पाठोपाठ एक अशा दोन-तीन मिटिंग्ज होत्या माझ्या, म्हणून मी सकाळी लवकरच व्यवस्थित खाऊन घेऊन, बाहेर पडले. मिटिंग्ज संपवून घरी परतायला अंदाजे संध्याकाळचे 5 तरी वाजणार होते.
ठरल्याप्रमाणे मिटिंग्ज आटोपून मी घरी परत आलो. तेव्हा मला जाणे मस्टच होते (अर्जंट कॉल होता) आलं ना लक्षात मला काय म्हणायचंय ते. मी जर 6/7 वर्षांचा लहान मुलगा असतो ना! आणि वर्गात असतो तर मी ताबडतोब हात वर करून टिचरला म्हणालो असतो - टिचर, फास्ट टॉयलेट! पण आता तशी अवस्था नव्हती. त्यामुळे कोणाच्याही परवानगीशिवाय मी टॉयलेटकडे धाव घेतली. टॉयलेट मधून बाहेर पडताना व्हॉट ए रिलिफ! असे शब्द अगदी अनवघानाने बाहेर पले. ये जो है जिंदगी मधील सतीश शहारच्या प्रसिध्द डायलॉगप्रमाणे.
फ्लश करण्याचा मी प्रयत्न केला. पण व्यर्थ! फ्लश टँक रिकामा होता. असं कसं झालं? मला खूप आश्चर्य वाटलं. कारण गेल्या 3 वर्षांच्या पुण्यातील वेदविहार मधील माझ्या घरात असं प्रथमच घडलं होतं. त्यावेळी एकच पर्याय माझ्यासमोर होता. तो म्हणजे फ्लश टँकमध्ये पाणी भरणे. म्हणून मी तपेलीने (तांब्याने) फ्लश टँकमध्ये पाणी भरू लागलो. 5/6 तपेल्या पाणी ओतून पाहतो तो पाणी टंकच्या बुडापाशीच होते. परत तपेल्यांनी पाणी टाकू लागलो. शेवटी वैतागलो आणि पाण्याने भरलेली बादलीच उचलली आणि टंकमध्ये ती ओतायला लागलो. आणि काय आश्चर्य ! अंदाजे पाऊण बादली ओतले तेव्हा कुठे टँक भरला. म्हणजे अंदाजे 10 ते 12 लिटर पाणी. चतुर म्हणाला असता क्या चमत्कार है।
आता असं बघा, आपले डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी प्या असं नेहमीच सांगत असतात. आपल्या वजनाच्या प्रमाणात म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक पौंडास अर्था औंस या हिशोबाने.
थ्री इडिएट मधील रेंचो सारखे तुम्ही स्मार्ट नसाल तर पौंड, औंस हा काय प्रकार आहे ते न समजल्यामुळे, तुम्हाला स्वत:चे केस उपटावे असे वाटत असेल ना! तुमचे कष्ट वाचविण्यासाठी म्हणून सांगतो, प्रत्येक 1 किलो वजनासाठी 30 मिलीलिटर पाणी म्हणजे जर तुमचे वजन 70 किलो असेल तर तुम्ही अंदाजे 2 लिटर पाणी प्यायले पाहिजे. (8 ते 10 ग्लास) दिवसाकाठी. डॉक्टरांचा हा सल्ला तुम्ही मानलाच तर तुमको दीनमे आठदस बार मूत्रविसर्जन भी करना पडेगी आणि प्रत्येक वेळी तुम्ही फ्लश केलेत तर तुम्ही 100 ते 120 लिटर पाणी वापरणार दर दिवशी.
मला झटका आला आणि मी गुगल वर सर्च मारून युरिनचे घटक कोणते ते शोधायचा प्रयत्न केला. गुगल वर क्लिक केले आणि मी विकीपिडीयावर येऊन पोहोचलो. ती माहिती खालीलप्रमाणे -
युरिन हे एक पारदर्शक द्रव्य आहे, त्याचा रंग पांढरा ते गडद पिवळा या दरम्यानचा असतो. पण सर्वसाधारणपणे तो फिकट पिवळा असतो. युरिन हे अॅक्वीयस द्रव्य असते ज्यात 95 टक्के पाणी व उरलेल्या 5 टक्के यात काही मेटेबोलिक वेस्ट प्रॉडक्टस् उदा. युरिया, क्षार आणि ऑरगॅनिक काम्पाऊंडस् असतात. या 5 टक्के वेस्ट मटेरियलमुळे तुमच्या युरिनला दुर्गंधी येऊ शकते/ येते. हे प्रत्येकालाच जाणवलेले आहे कधी ना कधी. उदा. पब्लिक टॉयलेटमध्ये जा किंवा पब्लिक गॅदरिंग जिथे टॉयलेटची सोय नसते काही वेळेस. अशा वेळी होल वावर इज अवर्स (वऱ्हाड निघालं लंडनला - मधील) या न्यायाने लोक उघड्यावर कुठेही मूत्रविसर्जन करतात.
चतुरच्या भाषेत इस देशमे मूत्रविसर्जन करनेके लिये प्रापर जगह कीदर है?
मग आता विचार करा दिवसाकाठी 100 ते 120 लिटर पाणी फ्लशमधून घालवणे तेही ज्यात (युरिन) 95 टक्के पाणी आहे त्या युरिनसाठी!
माझ्या बायकोचे मामा श्री. आनंद देवधर जे मुंबई येथून क्तक म्हणून निवृत्त झालेले आहेत. क्तक म्हणजे काय? हे माहित नसेल व तसे माहित नसण्याची शक्यता खूप आहे. तर क्तक म्हणजे हैड्रॉलिक इंजिनिअर - ज्याची बिनपाण्याची धुलाई होऊ शकते. जर मुंबईला एक दिवस पाणी पुरवठा झाला नाही तर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या खात्याच्या मुख्य व्यक्तीला क्तक का म्हणावं आणि च्क्तक का म्हणू नये, हे मला कृपया विचारू नका . अरे यार, हैड्रॉलिक इंजिनिअरचा शॉर्ट फॉर्म क्तक होता है, तो उसमे मेरी क्या गलती है?
असो. मामा मला खूप वर्षांपासून सांगत आहेत - प्रशांत मुंबईत एक वर्ष जरी व्यवस्थित पाऊस पडला नाही किंवा मुंबईत बाहेरून येणाऱ्या माणसांच्या झुंडी येणे असेच चालू राहिले आणि असे सर्वजण पाणी वापरत राहिले, तर एके दिवशी आपल्याला अर्धी मुंबई रिकामी करावी लागेल. थँक गॉड! मामांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईचा कल्पान्त, अजून तरी सत्यात उतरलेला नाही पण तो दिवस लवकरच उगवू शकेल की !
ये सीन तो डेडली है बॉस! पर करनेका क्या? मूत्रविसर्जन तो करनाही पडेगा? क्योंकी वो तो बायॉलॉजिकल नेसेसिटी है ना यार ।
म्हणून मग मी सांगतो - अगदी बरोबर! मूत्रविसर्जन करा पण कमोडमध्ये न करता त्याऐवजी इंडियन स्टाईल टॉयलेटमध्ये करा किंवा इतर कुठल्याही वॉटर ड्रेनमध्ये करा, जर इंडियन टॉयलेटही नसेल तर आणि नंतर काही तपेल्या भरून पाणी टाका.
गेले 6 महिने मी हे आचरणात आणले आहे. स्वच्छतेची अतिशय भोक्ती असलेली माझी बायको, अजून तरी झाडू वा चप्पल घरात घेऊन माझ्या अंगावर आलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाथरूममध्ये घाण वास / दुर्गंधी येत नाही.
चतुरच्या भाषेत - तुम्हाला काम जरूर हो जायेगी. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही 2010 या नवीन वर्षात तसा संकल्प करा. हा संकल्प तसा विचित्र किंवा विक्षिप्तपणाचा वाटत असला तरीही. कारण ते फार गरजेचे आहे. तुम्ही सुरूवात करा, अजूनही बरेच जण मग तसे करू लागतील आणि सध्याचे क्तक श्री. कदम म्हणतील - व्हॉट ए रिलिफ ! पण अगदी वेगळया संदर्भात.
महत्वाचे म्हणजे आपल्या या संकल्पामुळे, पाण्याच्या बचतीमुळे पुढील कित्येक वर्षे आपल्याला पाण्याची टंचाई भेडसावणार नाही.
चतुर म्हणतो त्याप्रमाणे पानी ही हमारा असली धन है । उसे बचाके रखना चाहिये ।
मैं (तुमचे नाव) शपथ लेती हू / लेता हू की मैं दिनमे 8 -10 ग्लास पानी जरूर पियुंगी और उसके बाद जितना बार मूत्रविसर्जन करना पडेगा, उतना करूंगी।लेकिन किये करायेपे पानी फेरने के लिये ʇफ्लशʈ नही करूंगी।
श्री. प्रशांत कऱ्हाडे, पुणे - (भ्र : 9822378284)