Source
जल संवाद
जेमतेम सातशे स्क्वे कि.मी. क्षेत्रफळाच्या भूभागावर पन्नास लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या सिंगापूर बेटाची 'जीवन' कहाणी मोठी अजब आहे. एक छोटे शहर - राज्य म्हणावे अशा या नगरीस नैसर्गिक झरे नव्हे तर भूगर्भातील जलसाठ्यांचेही वरदान लाभले नसल्यामुळे उपलब्ध जलस्त्रोतांचे व्यवस्थापन हेच तेथील सरकार व नागरिकांपुढे फार मोठे आव्हान होवून बसले आहे.
शहरीकरणाच्या झपाट्यामुळे 1960 व 70 च्या दशकात सिंगापूरला प्रदूषित नद्या, पाणीटंचाई व महापूर अशा सर्व संकटांना सामोरे जावे लागले. परंतु आज मात्र हे शहर स्थानिक नागरिक व उद्योगक्षेत्रास आवश्यक असलेले सर्व पाणीपुरवठ्यास सक्षम बनले आहे. त्यास ही किमया शक्य झाली आहे, ती अर्थात जलतंत्रज्ञानात भरपूर गुंतवणूक आणि एकात्मिक जल व्यवस्थापनाचा अंगिकार केल्यामुळेच ! गेल्या पन्नास वर्षात सिंगापूरकरांना नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या विविध व्यवस्था विकसित केल्या आहेत.
सिंगापूरच्या राष्ट्रीय जल संस्थेचे नाव आहे 'पब'. तिने पावसाचे पाणी गोळा करण्यापासून त्याचे शुध्दीकरण व पुरवठा करण्यापर्यंतची सर्व कामे एका छत्राखाली आणली आहेत. विशेष म्हणजे वापरून खराब झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते फेरवापरासाठी उपलब्ध करून देण्याचे कामही हीच संस्था करते. या पाण्यास 'Newater' असे म्हणतात.
'पब' ची पाणीपुरवठा व्यवस्था 'फोर नॅशनल टॅप्स' या नावाने ओळखली जाते. तिच्याद्वारे स्थानिक पर्जन्यक्षेत्रात गोळा केलेले - आयात केलेले - प्रक्रिया केलेले आणि क्षारमुक्त केले असे चार प्रकारचे पाणी नागरिकांना पुरविण्यात येते. ही सारीच कामगिरी इतकी विस्मयजनक आहे की त्याबद्दल 2007 मध्ये 'स्टॉकहोम इंडस्ट्री वॉटर अॅवॉर्ड' हा सर्वोच्च सन्मान देवून 'पब' चा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी 'ग्लोबल वॉटर इंटलीजन्स' च्या पुरस्कारासाठीही या संस्थेची निवड झाली होती.
सध्या सिंगापूरची पाण्याची रोजची मागणी 400 दशलक्ष गॅलन एवढी आहे. त्यापैकी 45 टक्के पाणी घरगुती वापरावर तर उर्वरित 55 टक्के पाणी बिगर घरगुती क्षेत्रात खर्ची पडते. आगामी काळात म्हणजे 2060 सालपर्यंत ही मागणी दुपटीने वाढणे अपेक्षित असून, त्यातील 70 टक्के पाणी बिगर घरगुती क्षेत्रात वापरले जाईल. ही वाढती मागणी पूर्ण केली जाईल ती मुख्यत: प्रक्रियायुक्त व क्षारमुक्त या दोन प्राकारच्या पाण्याच्या बळावर ! 2060 पर्यंत हे पाणी तयार करण्याची क्षमता तिपटीने वाढविण्याची तयारी 'पब' ने केली आहे. सध्या सिंगापूरमध्ये, पावसाचे पाणी व वापरलेले पाणी संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या पध्दतींचा वापर करण्यात येतो. पावसाचे पाणी ड्रेनेज - कॅनॉल्स व नद्यांच्या सर्वकष 'नेटवर्क' द्वारे ठिकठिकाणच्या तळी व जलाशयांत जमा केले जाते आणि तेथून साठवणीसाठी खास तयार केलेल्या 17 प्रमुख कृत्रिम तळ्यांमध्ये पाठविण्यात येते. याप्रकारे पावसाचे पाणी साठवण्याची प्रचंड व्यवस्था करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश आहे.
'मरिना रिझरवॉयर' - 'पंगुल रिझरवॉयर' व 'सेशनगुन रिझरवॉयर' या तीन कृत्रिम तळ्यांमुळे आता सिंगापूर 2/3 भूभाग 'पर्जन्यक्षेत्र' बनला आहे. त्यापैकी मरिना रिझरवॉयर 'मरिना बरॅज' हे धरण असून तेथे ताज्या पाण्याची निर्मिती तर होतेच परंतु शहराच्या सखल भागास पुरांचा तडाखा बसणार नाही. याची काळजीही या धरणाच्या भिंती घेतात. विशेष म्हणजे जलक्रीडेचे स्थान म्हणूनही ते लोकप्रिय झालेले आहे.
'न्यू वॉटर' हा सिंगापूरचा विशेष असून, शहरवासियांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होण्याचे ते सर्वात मोठे कारण आहे. अत्याधुनिक 'मेंब्रेन' तंत्रज्ञान वापरून हे पाणी तयार केले जात असल्याने ते अगदी शुध्द व स्वच्छ असते. एक लाखांहून अधिक वैज्ञानिक चांचण्यातून पार झाल्यानंतरच हे पाणी नागरिकांपर्यंत पोचते.
'एनव्हायरनमेंटल पब्लिक हेल्थ' व 'युनायटेड स्टेटस एन्वायरनमेंटल प्रोटेक्शन एजन्सी' या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी पिण्याच्या पाण्याचे जे निकष निश्चित केले आहेत ते 'न्यू वॉटर' अगदी शंभर टक्के पूर्ण करते. सध्या सिंगापूरकरांची 30 टक्के गरज हेच पाणी भागवित असून, त्यासाठी 2010 मध्ये छांगी येथे मोठा 'न्यू वॉटर प्लँन्ट' उभारण्यात आला आहे. सध्या त्याची क्षमता दरदिनी 50 दशलक्ष गॅलन पाण्याची असून, लवकरच त्यात आणखी बरीच वाढ होणार आहे.
सिंगापूरचा पहिला 'डीसॅलिनेशन प्लँन्ट' 2005 साली कार्यान्वित झाला. तेथे दररोज 30 दशलक्ष गॅलन एवढे खारट पाणी क्षारमुक्त केले जाते. खासगी - सरकारी भागीदारीत सुरू झालेला हा पहिला प्रकल्प होय. त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे दररोज 70 दशलक्ष गॅलन पाणी क्षारमुक्त करणारा प्रकल्प गेल्या सप्टेंबरात आकारास आला तो 'तुआस्प्रिंग डीसॅलिनेशन प्लँन्ट' च्या रूपाने ! सिंगापूरकरांची 25 टक्के पाण्याची गरज हा प्रकल्प भागवतो.
(खोल बोगद्याची मैलानि:स्सारण व्यवस्था) - एकूण 3.65 दशअब्ज डॉलर खर्चाच्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2009 मध्ये पूर्ण झाला असून, वापरलेल्या पाण्याचे संकलन, त्यावरील शुध्दीकरण प्रक्रिया व फेरवापरासाठी ते पुन्हा सोडणे ही सर्व कामे तेथे केली जातात. या व्यवस्थेचे वर्णन असे केले जाते. या प्रकल्पाच्या विस्ताराचे काम सध्या सुरू असून, ते 2022 मध्ये पूर्ण होईल. त्यात 'वॉटर रेक्लमनेशन इफिशियन्सी' राहाणार असून, त्यामुळे एकूण प्रकल्पाची 'एनर्जी इफिशियन्सी' खूप मोठ्या प्रमाणात वाढेल.
एकीकडे 'फोर नॅशनल टॅपस्' योजना यशस्वीपणे राबवित असतांना दुसरीकडे पाण्याच्या मागणीचे व्यवस्थापनही योग्याप्रकारे होईल, याची दक्षता सिंगापूर सरकार घेत आहे. पाण्याच्या मागणी - पुरवठ्याचे गणित जमले नाही तर सारेच गाडे फसेल. याची जाणीव असल्यामुळे सारा कारभार काटेकोर पध्दतीने केला जातो आणि त्यातच या व्यवस्थेच्या यशाचे इंगित दडलेले आहे.
या व्यवस्थेचा मुख्य आधार म्हणून 'न्यू वॉटर व्हिजीटर सेंटर' चा निर्देश केला जातो. तेथे एक अतिशय भव्य असे 'वॉटर म्युझियम' उभारण्यात आले असून, 'न्यू वॉटर तयार कसे होते आणि ते नागरिकांपर्यंत कसे पोचते' याची साद्यंत माहिती तेथे मिळते, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिकाधिक कार्यक्षमतेने व काटकसरीने कसा करावा याचेही धडे देण्यात येतात. 2003 साली सिंगापूरमधील पाण्याचा खप दरदिनी, दरडोई 165 लिटर एवढा होता. आता या म्युझियमने केलेल्या जनजागृतीमुळे तो 150 लिटरवर आला आहे. या चिमुकल्या देशात प्रत्येक नागरिकाला 'पाण्याचे मित्र बना' अशी शिकवण दिली जाते आणि असे 'उत्तम मित्र' बनणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी 'वॉटरमार्क' हा विशेष पुरस्कार देवून गौरवही करण्यात येतो.
पाण्याच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी 'प्युअर' नावाचे एक मासिकही या देशात प्रसिध्द होते. त्यातील संदेश छोट्या मुलांपर्यंत पोचविणारा 'वॉटर वॅली' नावाचा 'मस्कॉट ' हे सिंगापूरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. काही दिवसांपूर्वीच 'पब' ने नावाचा एक दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत ठिकठिकाणचे जलाशय, कॅनॉल ड्रेन्स व नद्यांच्या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून, या जागा म्हणजे जनसामान्यांसाठी नवी 'आनंदवने ' ठरतील.
एकात्मिक जलव्यवस्थापन आणि जलसंशोधन व विकास कार्यक्रमांसाठी प्रचंड गुंतवणुकीची तयारी या दोन वैशिष्ट्यांच्या बळावर आज सिंगापूरने आपल्या पाणीविषयक सर्व समस्यांवर मात केली आहे. जलप्रक्रियेची नवनवी तंत्रज्ञाने विकसित करण्याचे काम या देशात गेली तब्बल चार दशके सातत्याने सुरू असून, आता त्यास 'बायोमिमिक्री' व 'बायोमेटिक्स' सारख्या अत्याधुनिक शास्त्रांची जोडही दिली जावू लागली आहे. हे संशोधन अधिक व्यापक व चिरस्थायी करण्यासाठी 2006 साली खास 'एनव्हायरनमेंट अँड वॉटर इंडस्ट्री प्रोग्रॅम ऑफिस' सुरू करण्यात आले आहे. पर्यावरण व जलविषयक सर्व प्रश्नांवर उपाय शोधून काढणाऱ्या जागतिक संशोधन व विकास केंद्राचा दर्जा सिंगापूरला मिळवून देण्याची जबाबदारी या कार्यालयावर सोपविली गेली आहे. सध्या या देशात सुमारे दीडशे 'वॉटर कंपन्या' व पंचवीस संशोधन केंद्रे असून, त्यात 'सीडीएम स्मिथ', 'जनरल इलेक्ट्रिक', 'मिंट', 'ब्लॅक अॅन्ड व्हॅच' व 'इव्होक्वा' अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. याखेरीज 'नॅशनल रिसर्च फौंडेशन' ही सरकारी संस्थाही या क्षेत्रात कार्यरत असून, तिला 470 दशलक्ष डॉलर एवढ्या प्रचंड अनुदानाचे पाठबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सिंगापूरच्या एकूण अर्थव्यवस्थेत या जलउद्योगाचे स्थान फार मोठे असून, त्याच्या माध्यमातून दरवर्षी किमान 1.4 दशअब्ज डॉलर एवढ्या संपत्तीची भर सिंगापूरच्या खजिन्यात पडत असते. सध्या येथील वॉटर कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल एक हजार दशअब्ज डॉलर किंमतीची कंत्राटे मिळविलेली आहेत. हे प्रचंड आकडे पाहिले की जल उद्योगने सिंगापूरमध्ये केवळ पाण्याचा नाही तर पैशाचाही पूर आणलेला आहे, असेच म्हणावे लागते !
सिंगापूर शहराच्या 'न्यू वॉटर' ला संयुक्त राष्ट्रसंघाचा 2014 मधील 'वॉटर फॉर लाईफ' पुरस्कार प्रदानसांडपाण्याचे शुध्दीकरण करून ते पिण्यायोग्य बनविणाऱ्या सिंगापूर सरकारच्या कामगिरीचे संयुक्त राष्ट्रसंघाने कौतुक केले असून, त्यांच्या 'न्यू वॉटर' ला 2014 चा 'वॉटर फॉर लाईफ' पुरस्कार बहाल केला आहे. पाण्याशी संबंधित प्रश्नांवर साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, असे काम करणाऱ्या संस्था व देशांना 'यूएन वॉटर' तर्फे दरवर्षी हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. 'जागतिक जलदिना' निमित्ताने टोकियोत आयोजित एका खास सोहळ्यात सिंगापूरच्या 'पब' चे प्रमुख च्यु मेन लिआँग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 'न्यू वॉटर' हे अतिशय उच्च व शुध्द दर्जाचे पाणी असून, सांडपाण्यावर एक लाखाहून अधिक शास्त्रीय प्रक्रिया करून ते आकारास आणले जाते. हा पुरस्कार मिळावा यासाठी जगातून 30 अर्ज आले होते असे सांगून डॉ. जोसेफिना मायेस्तु म्हणाल्या की, त्यात 5 अर्ज आफ्रिकेतून व 12 अर्ज लॅटिन अमेरिकेतून व 9 अर्ज आशिया खंडातून आले होते.
(राष्ट्रवादी मासिकाच्या सौजन्याने)
डॉ. सुधीर भोंगळे, पुणे - मो : 09823057485

प्रक्रियायुक्त पाणी :

क्षारमुक्त पाणी :

डीप टनेल स्युअरेज सिस्टीम :